शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी ६३५ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 18:43 IST

नगराध्यक्षपदाच्या ८ जागांसाठी ४१ उमेदवार : नगरसेवकपदाच्या १८१ जागांसाठी ५९४ जण मैदानात

सांगली : सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी ४१ तर नगरसेवक पदाच्या १८१ जागांसाठी ५९४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी संपुष्टात आल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले.नगराध्यक्षपदासाठी दाखल २८ आणि नगरसेवकपदासाठी दाखल ३४७ अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पण, काही बंडखोरांना थंड करण्यात सर्वच प्रमुख पक्षांतील नेत्यांना अपयश आल्याचे दिसून आले. आष्टा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी दोनच अर्ज राहिल्यामुळे दुरंगी लढत असून उर्वरित सात ठिकाणी तिरंगी सामना रंगणार आहे.नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या तब्बल १११ अर्जांपैकी ३७ अर्ज अपात्र तर ६९ अर्ज पात्र ठरले होते. यापैकी शेवटच्या दिवशी २८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ४१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नगरसेवकपदाच्या १८१ जागांसाठी चक्क एक हजार ५६७ अर्ज दाखल होते. छाननीमध्ये ६२६ अर्ज अपात्र ठरल्यामुळे ९४१ अर्ज पात्र ठरले होते. नगरसेवकपदाच्या निवडणुकीतून शुक्रवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ३४७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ५९४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून अर्ज भरलेल्यांची मनधरणी करण्यासाठी राजकीय ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली होती. नेत्यांच्या प्रयत्नानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अनेक बंडखोरांनी माघार घेतली. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यामुळे उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांनी एबी फॉर्म दिल्यामुळे त्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पण, अपक्ष उमेदवारांना २६ नोव्हेंबरला चिन्ह मिळणार आहे. त्यानंतर त्यांचा प्रचार सुरु होणार आहे.

नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी रिंगणातील उमेदवारनगरपरिषद-नगरपंचायत / नगराध्यक्षपदासाठी/ नगरसेवकपदासाठीउरुण-ईश्वरपूर / ६/ ९४विटा / ३ / ६९आष्टा / २ / ७२तासगाव /५ / ८८जत/७ / ९४पलूस/६ / ६७शिराळा/८ / ५०आटपाडी/४ / ६०

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Local Body Election: 635 Candidates Compete for 189 Seats

Web Summary : In Sangli, 635 candidates are contesting for 189 seats across eight local bodies. Despite efforts, some rebels remain, leading to multi-cornered fights. Candidates got party symbols; independent's await theirs.