शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत हद्दपार गुंडासह तिघांकडून ६ पिस्तुले जप्त, पुरवठादार पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:16 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषणची वारणाली परिसरात कारवाई

सांगली : हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून सांगलीत आलेल्या किरण शंकर लोखंडे (वय २४, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) आणि साथीदार अभिजित अरुण राणे (वय ३२, रा. शारदानगर, सांगली), तुषार नागेश माने (वय ३०, लक्ष्मीनगर, हडको कॉलनी) या तिघांकडून सहा पिस्तुले, तीन काडतुसे जप्त केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. मध्यप्रदेशातील पाजी हा उमराटी, पोस्ट बलवाडीतील पुरवठादार पसार आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर आणि कर्मचाऱ्यांचे पथक स्थापन करून सूचना दिल्या होत्या. पथकातील कर्मचारी संकेत कानडे, पवन सदामते, अभिजित माळकर, सूरज थोरात यांनी अकुजनगर ते वारणाली जाणाऱ्या रस्त्यावरील हद्दपार असलेला गुन्हेगार किरण लोखंडे, अभिजित राणे, तुषार माने हे पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर ६ पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे मिळाली. पिस्तुले कोठून आणली याची चौकशी केल्यानंतर त्यांनी मे २०२५ मध्ये मध्यप्रदेशातील उमराटी, पोस्ट बलवाडी येथे जाऊन पाजी नामक व्यक्तीकडून ६ पिस्तुले खरेदी केल्याची कबुली दिली. तिघांना ताब्यात घेऊन पिस्तुले, काडतुसे, असा ३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा शस्त्रसाठा आणि दुचाकी, असा ४ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कर्मचारी ऋषिकेश सदामते यांनी याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमानुसार फिर्याद दिली आहे.या कारवाईत कर्मचारी संदीप पाटील, अतुल माने, अरुण पाटील, प्रकाश पाटील, संदीप गुरव, रणजित जाधव, उदयसिंह माळी, विनायक सुतार, रोहन घस्ते, अजय पाटील, अभिजित पाटील सहभागी झाले होते.

किरण लोखंडे हा खुनातील संशयितकुपवाडमधील कामगार कंत्राटदार दत्तात्रय पाटोळे याच्या खुनातील पाच संशयितांचा सहभाग होता. किरण लोखंडे हा पाटोळे याच्या खुनातील संशयित आहे. त्याच्यावर सहा महिन्यांपूर्वी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. हद्दपारीचा भंग केल्याबद्दलही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Six pistols seized from three, supplier absconding.

Web Summary : Three men, including an exile, were arrested in Sangli with six pistols and ammunition. They confessed to buying the weapons in Madhya Pradesh. Police seized firearms worth ₹3.61 lakh and a bike.