शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

सांगलीतील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५२० कोटी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 12:11 IST

१५ टक्के व्याजासह बिले देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सांगली : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे मिळाली नाहीत. जिल्ह्यातील कारखान्याकडे जवळपास ५२० कोटी रुपये थकीत आहेत. ऊस दराची कोंडी फुटत नसल्यामुळे बिल वर्ग न केल्याचे जुजबी कारण साखर कारखानदार देत आहेत. दरम्यान, या कारखान्यांनी १४ दिवसांत बिल न दिल्यामुळे १५ टक्के व्याजासह पैसे तत्काळ वर्ग करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांपैकी १७ कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहेत. या कारखान्यांकडून प्रतिदिन एकूण ७५ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३२ लाख टनांहून अधिक उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यापैकी क्रांती कारखान्याने प्रति टन ३१०० रुपये आणि दत्त इंडिया कारखान्याने एफआरपी अधिक १०९ रुपये पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरितांची इतर देणी प्रलंबित आहेत. त्यांची इतर देणी प्रलंबित आहेत. कारखान्यांकडे जवळपास ५२० कोटी रुपये थकीत राहिले आहेत. या कारखान्यांनी ऊस दराची कोंडी फुटली नसल्यामुळे बिल वर्ग करण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारजिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत ३२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला, तरीही ऊस दराची कोंडी फुटली नसल्यामुळे शेतकऱ्यांची बिले कारखान्यांनी थांबविली आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांकडे ५२० कोटी रुपयांची ऊस बिले थकली आहेत. शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा करावीत, अशी मागणी शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

शासन आदेशाकडेही दुर्लक्ष'ऊस नियंत्रण आदेश १९६६' नुसार गळीतासाठी ऊस कारखान्यास दिल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी दिली पाहिजे. त्यापेक्षा उशीर केल्यास १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना उसाची बिले द्यावीत, असे शासन आदेशात म्हटले आहे. पण, या नियमाचे कारखान्यांनी पालन केले नाही.

ऊस दराची आज बैठकही रद्दऊस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची मंगळवार दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार होती. या बैठकीत ऊस दराची कोंडी फुटणार होती. पण, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी रजेवर गेल्यामुळे दि. २६ रोजी बैठक होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी