Sangli ZP Election Voting 2026: दुपारनंतर मतदारांच्या लागल्या रांगा, जिल्ह्यात ५१.४७ टक्के मतदान

By अशोक डोंबाळे | Updated: February 7, 2026 17:58 IST2026-02-07T17:58:08+5:302026-02-07T17:58:42+5:30

दुपारी ४ नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा

51 percent voting for Sangli Zilla Parishad, Panchayat Samiti | Sangli ZP Election Voting 2026: दुपारनंतर मतदारांच्या लागल्या रांगा, जिल्ह्यात ५१.४७ टक्के मतदान

Sangli ZP Election Voting 2026: दुपारनंतर मतदारांच्या लागल्या रांगा, जिल्ह्यात ५१.४७ टक्के मतदान

सांगली : जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी शनिवारी सकाळपासूनच चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. एकूण १८ लाख १८ हजार ७४४ मतदारांपैकी दुपारी ३:३० वाजेपर्यंत नऊ लाख ३६ हजार १८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जवळपास ५१.४७ टक्के मतदान झाले होते.

जिल्ह्यात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ९:३० वाजता ७.०३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदारांच्या मतदान केंद्रावर गर्दी होण्यास सुरुवात झाली. दुपारी साडेअकरा वाजता २०.३० टक्के तर दुपारी दीड वाजता ३६.०१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५१.४७ टक्के मतदान झाले आहे. दुपारी ४ नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी

तालुका - मतदानाची टक्केवारी

  • आटपाडी - ५४.३५
  • जत - ४७.०९
  • खानापूर - ४९.६६
  • कडेगाव - ५५.९४
  • तासगाव - ४८.८४
  • क.महांकाळ - ४५.१९
  • पलूस - ५६.०४
  • वाळवा - ५८.५९
  • शिराळा - ५४.१८
  • मिरज - ४६.९९
  • एकूण - ५१.४७

Web Title : सांगली ZP चुनाव 2026: दोपहर बाद मतदाताओं की भीड़, 51.47% मतदान

Web Summary : सांगली ZP चुनाव में उत्साहपूर्ण मतदान हुआ। दोपहर 3:30 बजे तक जिले में 51.47% मतदान दर्ज किया गया। सुबह 7:30 बजे मतदान शुरू हुआ, जो दिन भर बढ़ता रहा और बाद में लंबी कतारें लगीं।

Web Title : Sangli ZP Election 2026: 51.47% Voter Turnout Recorded After Afternoon Rush

Web Summary : Sangli ZP election saw enthusiastic voting. By 3:30 PM, 51.47% turnout was recorded across district. Polling began at 7:30 AM, gaining momentum throughout the day with long queues forming later.