शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव शाखेतील अपहाराचे ४० लाख रुपये वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 11:41 IST

दुष्काळ मदत निधीवरील डल्ला : शंभर टक्के रक्कम वसुलीसाठी बँक प्रशासनाकडून प्रयत्न

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेमधील शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ५६.३३ लाख रकमेवर बँकेच्या कर्मचाऱ्यानेच डल्ला मारला होता. निलंबित कर्मचारी योगेश वजरीनकर यांनी ४० लाख रुपये बँकेत जमा केले आहेत. अपहारातील १०० टक्के रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत.जिल्हा बँकेच्या तासगावमधील मार्केट यार्ड शाखेतील दुष्काळी निधीवर तेथील कर्मचारी योगेश वजरीनकरने अपहार केला. त्यांचा सहकारी निमणी (ता. तासगाव) शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदतीत २१ लाख रुपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी जबाबदार धरून प्रमोद कुंभार, तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम. व्ही. हिले आणि लिपिक योगेश वजरीनकर यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई झाली.

या कारवाईनंतर जिल्हा बँक प्रशासनाने केवळ दोनच दिवसात ४० लाख रुपये वसूल केल्याची माहिती देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व शाखांची तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

सहा पथके, ४८ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणजिल्हाभरात सहा पथके स्थापन केली आहेत. पथकामध्ये ४८ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांना मंगळवारी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. संबंधित पथकाकडून येत्या पाच ते सहा दिवसांत तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

दुष्काळी निधीतील अपहार प्रकरणी तिघांवर निलंबनाची कारवाई केली. सखोल चौकशी करून अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर फौजदारीही दाखल होईल. रक्कम वसूल झाली तरी त्यांच्यावरील कारवाई प्रक्रिया सुरूच ठेवली जाईल. - शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकCrime Newsगुन्हेगारी