शिराळा लोकन्यायालयात ४० लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:29 IST2021-09-26T04:29:21+5:302021-09-26T04:29:21+5:30
शिराळा : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये एकूण ७०१ प्रकरणे तडजोडीने मिटवून ४० लाख २७ हजार ...

शिराळा लोकन्यायालयात ४० लाखांची वसुली
शिराळा : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये एकूण ७०१ प्रकरणे तडजोडीने मिटवून ४० लाख २७ हजार ९०५ रुपये वसूल झाल्याचे न्यायाधीश भूषण काळे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शिराळा तालुका विधी सेवा समिती आणि शिराळा वकील संघटना यांच्या वतीने या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. लोकन्यायालयामध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड होऊन प्रलंबित प्रकरणे १२७ व दावा पूर्व प्रकरणे ५७४ अशी एकूण ७०१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यामध्ये ४० लाख २७ हजार ९०५ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी न्यायाधीश, कर्मचारी, शिराळा वकील संघटना, पंचायत समिती, नगरपंचायत, बँका, भारत संचार निगम, शिराळा, कोकरूड पोलीस ठाणे यांचे सहकार्य लाभले.