4 thousand hectares of farmland | ६५ हजार हेक्टर शेतीला दणका
६५ हजार हेक्टर शेतीला दणका

ठळक मुद्दे६५ हजार हेक्टर शेतीला दणकातब्बल लाखभर शेतकऱ्यांचा पीकविमाच नसल्याचे स्पष्ट

संतोष भिसे 

सांगली : सलग चार महिने कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या कृषीक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. बागायत शेतीची दशकभराची पिछेहाट झाली असून, शेकडो एकर द्राक्षबागा यंदा सोडून द्याव्या लागल्या आहेत. शासनयंत्रणा प्रत्यक्ष मदतीऐवजी अद्याप पंचनाम्यातच गुंतली आहे. विशेष म्हणजे तब्बल लाखभर शेतकऱ्यांचा पीकविमाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरिपाची पिके हातातून गेली आणि रब्बीच्या पेरण्या करताच आल्या नाहीत, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. रब्बीच्या ज्वारी, हरभरा, गहू आदी पेरण्या आता कोठे सुरू झाल्यात. ७०५ पैकी तब्बल ५७३ गावे अवकाळीच्या फेºयात अडकली. सव्वा लाख शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला. पंचनामे अजूनही सुरूच आहे.

सव्वा लाख शेतकऱ्यांनी ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टर पेरण्या केल्या होत्या; त्यापैकी ६५ हजार २६७ हेक्टर शेतीचे कंबरडे पावसाने मोडले. पाऊस थांबताच पंचनामे सुरू झाले. आजवर ९५ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या ५४ हजार हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण झालेत. आॅक्टोबरच्या पावसाने सर्वाधिक हानी केल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही ११ हजार २०७ हेक्टरचे पंचनामे व्हायचे आहेत.

Web Title: 4 thousand hectares of farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.