शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

सांगलीतील व्यापारी पिता-पुत्राकडून चार कोटींची फसवणूक, मसाले व्यापाऱ्यात गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 18:24 IST

बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथील व्यापारी तय्यूब रज्जाक मोटलाणी (वय ५५) व इरफान तय्यूब मोटलाणी (२२, रा. ताकारी, ...

बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) येथील व्यापारी तय्यूब रज्जाक मोटलाणी (वय ५५) व इरफान तय्यूब मोटलाणी (२२, रा. ताकारी, ता. वाळवा) या पिता-पुत्रांनी होलसेल किराणा व्यापारात गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ४ कोटी ३ लाख ४० हजारांची फसवणूक करून पोबारा केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत सुशांत माणिकराव कोळेकर (रा. रेठरेहरणाक्ष) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मोटलाणी पिता-पुत्र ताकारी येथील होलसेल व रिटेल व्यापारी आहेत. त्यांनी रेठरेहरणाक्ष येथील सुशांत कोळेकर यांना ‘होलसेल किराणा व्यापारात गुंतवणूक कर यात भरपूर पैसा भेटतो’ असे सांगून जाळ्यात ओढले. एस. के. ट्रेडर्स नावाची कंपनी काढली. या कंपनीद्वारे वेलदोडा, जिरे, मोहरी या मसाल्यांची खरेदी करण्यासाठी काेळेकर यांनी रोख १५ लाख ९० हजार रुपये तय्यूब याच्याकडे दिले. यावर न थांबता त्याचा मुलगा इरफान याने बजाज फायनान्समधून कोळेकर यांच्या नावे कर्ज घेतले. आरटीजीएस करून ती रक्कम स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली. त्यातील दोन लाख थकबाकी केली.

मोटलाणी पिता-पुत्रांनी ‘व्यापारासाठी पैशांची गरज आहे’ असे सांगून ३० जून २३ राेजी कोळेकर यांच्या नावे मोहरी मसाल्यावर सांगली अर्बन बँकेच्या इस्लामपूर शाखेतून १२ लाखांचे माल तारण कर्ज काढले. ५ मार्च २४ रोजी जिरे या मालावर ७ लाख ५० हजार मंजूर करून घेतले. १३ मार्च रोजी आयडीबीआय बँकेच्या तळसंदे शाखेतून जिरे मालावर ४५ लाख रुपये मंजूर करून घेतले. तिन्ही प्रकरणांतील रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली. रोख व कर्जाऊ रक्कम मिळून ८२ लाख ४० हजारांची फसवणूक केली.याशिवाय इतर लोकांच्या नावे माल तारण कर्ज २ कोटी २१ लाख ३४ हजार तर व्यापाराकरिता ९९ लाख ६६ हजार ४७ रुपये उचलले आहे, अशी एकूण ४ कोटी ३ लाख ४० हजारांची फसवणूक केली. माेटलाणी पिता-पुत्र सध्या गायब आहेत. याबाबत इस्लामपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस