वारणा धरणात 34.02 तर कोयना धरणामध्ये 104.61 टी.एम.सी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 17:00 IST2019-09-19T16:59:47+5:302019-09-19T17:00:35+5:30

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

34.02 in TMC water and 104.61 TMC water storage in Koyna Dam | वारणा धरणात 34.02 तर कोयना धरणामध्ये 104.61 टी.एम.सी पाणीसाठा

वारणा धरणात 34.02 तर कोयना धरणामध्ये 104.61 टी.एम.सी पाणीसाठा

ठळक मुद्देवारणा धरणात 34.02 तर कोयना धरणामध्ये 104.61 टी.एम.सी पाणीसाठा जिल्ह्यात सरासरी 13.40 मि. मी. पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

दिनांक 19 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 104.61 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 13.45 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 10.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.96 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.15 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरलेले आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 1 हजार 701 क्युसेक्स तर कोयना धरणातून 11 हजार 480 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 34 हजार 324 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 9 फूट 3 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 11 फूट 6 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).


जिल्ह्यात सरासरी 13.40 मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 13.40 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कडेगाव तालुक्यात सर्वाधिक 43.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज - 8.9 (535.4), जत 5.8 (211.6), खानापूर-विटा 27 (351.8), वाळवा-इस्लामपूर - 8.6 (734.2), तासगाव 7.4 (402.7), शिराळा - 6.8 (1899.8), आटपाडी - 24.7 (208.8), कवठेमहांकाळ 10.3 (307.8), पलूस - 9 (436.1) व कडेगाव 43.4 (736).
 

Web Title: 34.02 in TMC water and 104.61 TMC water storage in Koyna Dam