शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पोलिसाच्या कुटुंबाला ३० लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 18:45 IST

police, funds, accident, sangli कासेगाव पोलीस ठाण्याकडील हवालदार वजीर ईलाही मुजावर (रा. मिरज) यांचा अज्ञात वाहनाने ठोकरल्याने वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. मुजावर यांच्या कुटुंबियांना अपघाती विम्यातून ३० लाखांची मदत करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याहस्ते कुटुंबाला धनादेश सुपूर्द करण्यात आला.

ठळक मुद्देसांगलीत पोलिसाच्या कुटुंबाला ३० लाखांची मदत अपघात विमा : अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

सांगली : कासेगाव पोलीस ठाण्याकडील हवालदार वजीर ईलाही मुजावर (रा. मिरज) यांचा अज्ञात वाहनाने ठोकरल्याने वर्षभरापूर्वी मृत्यू झाला होता. मुजावर यांच्या कुटुंबियांना अपघाती विम्यातून ३० लाखांची मदत करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याहस्ते कुटुंबाला धनादेश सुपूर्द करण्यात आला.पोलीस हवालदार वजीर ईलाही मुजावर यांनी विश्रामबाग, सांगली शहर, वाहतूक शाखा, जिल्हा न्यायालय, तासगाव, कासेगाव या ठिकाणी सेवा बजावली होती. ते कासेगाव पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. ३१ डिसेंबर २०१९ रोजी ते घरी धार्मिक कार्यक्रमासाठी कळंबी (ता. मिरज) येथे गेले होते.

कार्यक्रम संपल्यानंतर ते मोटारसायकलीने पंढरपूर रोडने मिरजेकडे येत असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात गेली. याचवेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना ठोकरल्याने ते जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या पोलीस कुटुंबाला अपघात विमा मिळावा, यासाठी अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी ॲक्सीस बँकेचे शाखाधिकारी अनंत चौधरी यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. मंगळवारी मृत हवालदाराच्या नातेवाईकांना ३० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसfundsनिधीSangliसांगली