शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

गावकऱ्यांची एकी लय भारी; सांगली जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायती बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 3:24 PM

कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे.

सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये बुधवारी अर्ज माघारीच्या दिवशी २८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तसेच कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. यामुळे ४१९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.आमदार अनिल बाबर यांच्या गार्डी ग्रामपंचायतीसह ढवळेश्वर, माधळमुठी, घोटी खुर्द, वासुंबे, धोंडेवाडी, धोंडगेवाडी, गोरेवाडी या आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. रेवणगाव ग्रामपंचायतीचे सर्व ७ सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले असले तरी सरपंच पदासाठी या गावात तिरंगी लढत होत आहे.कडेगाव : तालुक्यात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी येवलेवाडी, विहापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. उपाळावी (मायणी), शाळगाव ग्रामपंचायतींमधील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.तासगाव :  तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी आरवडे, चिंचणी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात सर्वपक्षीय नेत्यांना यश आले आहे. मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील देवनाळ, शिंगणापूर, पलूस तालुक्यातील हजारवाडी, पुणदीवाडी आदी ग्रामंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे.शिराळा : तालुक्यातील वाकाईवाडी, खुंदलापूर, चिखली, शिंदेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

सरपंच बिनविरोध, सदस्यांसाठी निवडणूकजिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु, सदस्य पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज राहिल्यामुळे तेथील निवडणूक लागली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य बिनविरोध निवडून आले असून, सरपंच पदासाठी निवडणूक लागली आहे. निवडणुकीचे वेगवेगळे रंग सर्वत्र पहायला मिळत आहेत.एकनाथ शिंदे गटाच्या पाच ग्रामपंचायती बिनविरोधमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार अनिल बाबर गटाने खानापूर तालुक्यातील एकूण आठ ग्रामपंचायती बिनविरोध काबीज केल्या आहेत. यापैकी गार्डी, ढवळेश्वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविराेध करून खाते खोलले आहे. उर्वरित तीन ग्रामपंचायती विराेधकांच्या ताब्यात गेल्या आहेत.प्रचाराची तयारीअर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आता प्रचार रंगणार असून त्याची तयारी उमेदवारांनी अगोदरच केली आहे.प्रशासनाचा रात्री उशिरापर्यंत गोंधळग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारीची मुदत बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची होती. पण, प्रशासनाकडून अर्ज माघारीची संख्या आणि बिनविरोध ग्रामपंचायती यांचा ताळमेळ घालण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालूच होते.वाळवा : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींपैकी येलूर, कोळे, गौंडवाडी, धोत्रेवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडी या सात ग्रामपंचायती बिनविरोध करून गावांनी एकसंधपणा दाखविला आहे.कामेरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात दोन्ही गटांना अपयश आले. चार अर्ज राहिल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. सरपंच पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी प्रणीत भैरवनाथ पॅनेलकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत जगदीश पाटील यांना विरोधी छगनबापू पाटील पॅनेलने पाठिंबा दिला आहे. त्यांच्याशिवाय विक्रम हिंदूराव पाटील, रघुनाथ हळदे - पाटील व हंबीरराव पाटील या तिघांचे सरपंच पदासाठी अर्ज राहिले आहेत.वाळवा ग्रामपंचायतीत थेट सरपंच पदासाठी हुतात्मा गटातील संदेश कांबळे विरुद्ध राष्ट्रवादीचे विद्याजीतराजे धनवडे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे.बोरगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीतून दोन अपक्षांनी सरपंच पदासाठीचे अर्ज माघारी घेतल्याने सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक