शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात २५ लाख लिटर पेट्रोल, २६ लाख लिटर डिझेल शिल्लक; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:01 IST

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

सांगली : जिल्ह्यात इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांकडे २५ लाख लिटर पेट्रोल तर २६ लाख २० हजार लिटर डिझेलचा साठा शिल्लक आहे. पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असल्यामुळे टंचाई होणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. तसेच एलपीजी गॅसचाही साठा पुरेसा आहे, असेही ते म्हणाले.जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीकडे पेट्रोल चार लाख ५० हजार लिटर आणि डिझेल पाच लाख ५० हजार लिटर, बीपीसीएल कंपनीकडे पेट्रोल पाच लाख २० हजार लिटर व डिझेल सहा लाख ५० हजार लिटर, आयओसीएल कंपनीकडे पेट्रोल १४ लाख ९० हजार लिटर व डिझेल १४ लाख २० हजार लिटर इतका साठा उपलब्ध आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. तरी सर्व ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे. पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा साठा करण्यासाठी अनावश्यक गर्दी करू नये. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.

दिशाभूल करणाऱ्याविरोधात कारवाईचुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी काकडे यांनी केले.

जिल्ह्यात २९८३ टन गॅसचा साठाजिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सध्या जिल्ह्यात एलपीजीचा एचपीसीएल कंपनीकडे दोन हजार ७४९ टन गॅस साठा शिल्लक असून, सुमारे दोन हजार ३७ टन गॅस साठा येणार आहे. बीपीसीएल कंपनीकडे ७५.१ टन गॅस शिल्लक असून व सुमारे ११६.४ टन साठा मार्गावर आहे. आयओसीएल कंपनीकडे ४३ टन इतका साठा उपलब्ध आहे. सर्व एलपीजी कंपन्यांच्या विक्री अधिकारी व प्रतिनिधींनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी ग्राहकांना वेळेवर व नियमानुसार सिलिंडर पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District has Ample Petrol, Diesel Stock: Collector Assures

Web Summary : Sangli district has sufficient petrol (25 lakh liters) and diesel (26.2 lakh liters) stock. Collector urges citizens not to panic or hoard fuel, as LPG supply is also adequate. Action will be taken against misinformation.
टॅग्स :Petrolपेट्रोलSangliसांगलीPetrol Pumpपेट्रोल पंपcollectorजिल्हाधिकारी