कामेरी येथे 25 एकरातील ऊस आगीत जाळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 22:17 IST2021-02-08T22:17:25+5:302021-02-08T22:17:36+5:30

fire in sugarcane : 17 शेतकऱ्यांचे 10 लाखापेक्षा जास्त नुकसान. कामेरी-तुजारपूर रस्त्यालगत सकाळी 11 च्या सुमारास लागलेली आग 3तासाने आली आटोक्यात 

25 acres of sugarcane set fire at Kameri | कामेरी येथे 25 एकरातील ऊस आगीत जाळून खाक

कामेरी येथे 25 एकरातील ऊस आगीत जाळून खाक

कामेरी : कामेरी ता वाळवा येथील कामेरी तुजारपूर रस्त्या लगत च्या राजाराम बापू व कृष्णा सहकारी साखर कारखान्याला नोंदणी असणारा 20 ते 25 एकर ऊसाला  सोमवार 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 च्या सुमारास आग लागल्याने 1 तेव 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तलाठी व साखर कारखाना  ऊसतोडणी कार्य कडून  व्यक्त केला गेला आहे . 


परिसरातील शेतकरी ही आग वीजेच्या शॉर्ट सर्किट ने लागल्याचे सांगत असले तरी वीज वितरण कंपनी च्या कामेरी कार्यालयातीळ कनिष्ठ शाखाअभियंता जितेंद्र पाटील यांनी हे साफ चुकीचे असल्याचे सांगितले .इस्लामपूर येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती साठी सकाळी 10.30 पासून  11.25 वाजे विद्युत पुरवठा बंद असल्याने शॉर्ट सर्किटने  आग लागण्याचा प्रश्न च येत नसल्याचे सांगितले .


कामेरी येथील पांढरी परिसरातील सुदर्शन पाटील ,कापशे,माली,मदने मळ्यातिला 15 ते 20 शेतकऱ्यांचा 20 ते 25 एकर ऊस या आगीमध्ये पूर्ण जळाल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असावे असा अंदाज तलाठी रामेश्वर शिंदे यांनी मंडल अधिकारी मनोहर पाटील यांचे आदेशानुसार पंचनामा केल्या नंतर सांगितले .11.30 च्या सुमारास सुदर्शन पाटील ,श्रीकांत पाटील,प्रदीप पाटील,मुकुंद माळी यांनी या आगी बाबतची माहिती कोतवाल आनंदराव ठोंबरे याना दिली. इस्लामपूर येथे अग्निशमन उपलब्ध होऊ न शकल्याने व विदुयत पुरवठा बँड असल्याने आगीने उग्र रूप धारण केले होते

Web Title: 25 acres of sugarcane set fire at Kameri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग