शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

अवसायनातील बॅँकांकडून २२७ कोटींच्या ठेवींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:42 PM

आर्थिक गैरव्यवहारांसह इतर अनेक कारणांनी अवसायनात गेलेल्या जिल्ह्यातील सहा बॅँकांच्या अवसायकांनी ठेवीदारांना थोडाफार का होईना दिलासा दिला आहे. सहा बॅँकांकडून आत्तापर्यंत २२७ कोटी ७१ लाख ठेवींचे ठेवीदारांना वाटप केले असून,

ठळक मुद्देसहा बॅँकांकडून आत्तापर्यंत २२७ कोटी ७१ लाख ठेवींचे ठेवीदारांना वाटप

शरद जाधव ।सांगली : आर्थिक गैरव्यवहारांसह इतर अनेक कारणांनी अवसायनात गेलेल्या जिल्ह्यातील सहा बॅँकांच्या अवसायकांनी ठेवीदारांना थोडाफार का होईना दिलासा दिला आहे. सहा बॅँकांकडून आत्तापर्यंत २२७ कोटी ७१ लाख ठेवींचे ठेवीदारांना वाटप केले असून, यासाठी विमा महामंडळाने मंजूर केलेल्या ‘क्लेम’चा फायदा ठेवीदारांना झाला आहे. आता थकित कर्जाची वसुली व बॅँकांच्या स्थावर मालमत्तांची विक्री करून महामंडळाचे पैसे अदा केले जाणार आहेत.

सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यातील काही बॅँकांतील गैरव्यवहारामुळे बॅँका अवसायनात गेल्या. अवसायकांनी ताबा घेत ठेवीदारांच्या पैशाच्या तरतुदीस सुरुवात केली होती. जिल्ह्यातील सात नागरी व सहकारी बॅँकांचा यात समावेश आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँक, कुपवाड अर्बन, मिरज अर्बन बॅँक, यशवंत बॅँक, कृष्णा व्हॅली बॅँक आणि धनश्री महिला बॅँक, मिरजचा यात समावेश आहे. सातपैकी लॉर्ड बालाजी बॅँकेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

या सर्व बॅँकात वसंतदादा बॅँकेच्याच ठेवी सर्वाधिक आहेत. वसंतदादा बॅँकेच्या १ लाखाच्या आतील ठेवी १७८ कोटी ३८ लाख १२ हजार आहेत. यातील १५३ कोटी ८१ लाख ७२ हजारांच्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यात आल्या आहेत. या बॅँकेच्या १ लाखावरील ठेवी १५६ कोटी ३४ लाख ६६ हजार होत्या. त्यातील २ कोटी ९८ लाख ४४ हजार रुपये ठेवीदारांना मिळाले आहेत.

उर्वरित बॅँकांमध्ये कुपवाड अर्बन बॅँकेने ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या आहेत; तर यशवंत बॅँकेनेही १ लाखाच्या आतील ठेवी परत केल्या आहेत. कुपवाड अर्बन बॅँकेच्या १ लाखाच्या आतील १२ कोटी २९ लाखांच्या ठेवी होत्या, त्यातील ११ कोटी ३ लाखांचे वाटप ठेवीदारांना करण्यात आले आहे. या बॅँकेने दोन्ही प्रकारातील ठेवी परत केल्या आहेत.

मिरज अर्बन बॅँकेच्या १ लाखाच्या आतील ४२ कोटी २९ लाख ठेवी असून, त्यातील ४० कोटी ५९ लाखांच्या ठेवी ठेवीदारांना परत करण्यात आल्या आहेत. एक लाखांवरील ठेवी मात्र परत देण्यात आल्या नसून, वसुलीनंतर या ठेवी देण्यात येणार आहेत. मिरज येथील यशवंत बॅँकेकडे १ लाखाच्या आतील ११ कोटी ४६ लाख ३८ हजारांच्या ठेवी होत्या, त्यातील १० कोटी ५८ लाख परत देण्यात आल्या आहेत.विमा महामंडळाचा क्लेमरिझर्व्ह बॅँकेच्या अखत्यारित असलेल्या ‘डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड के्रडिट गॅरंटी कार्पोरेशन’च्या माध्यमातून अवसायनातील बॅँकांना विम्याचा ‘क्लेम’ मंजूर झाला आहे. यातून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात येत आहेत. विमा महामंडळाला ही रक्कम परत करावयाची असून, थकीत कर्जाची वसुली व बॅँकांच्या स्थावर मालमत्तांची विक्री करून हे पैसे परत करावे लागणार आहेत. या अटीवरच विमा महामंडळाने ‘क्लेम’ मंजूर केला आहे.

एक लाखाच्या आतील एकूण ठेवी - ३२६ कोटी ६६ लाख ३० हजारएक लाखाच्या आतील एकूण ठेवींचे वाटप - २१९ कोटी १५ लाख ७२ हजारएक लाखांवरील एकूण ठेवी - १८१ कोटी ९० लाख ८३ हजारएक लाखांवरील एकूण ठेवींचे वाटप - ८ कोटी ५५ लाख ४४ हजार

टॅग्स :SangliसांगलीMONEYपैसाbankबँक