शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

सांगली जिल्ह्यात दिवसाला २ अपघात; १० महिन्यांत सव्वादोनशे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:52 IST

अपघातांची संख्या चिंताजनकच; प्रबोधनाबरोबरच कडक कारवाईही हवी

सांगली : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा हा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याचा सप्ताह म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. यानिमित्त उपक्रमही राबवत अपघात टाळण्यासाठी प्रबोधन केले जाते. तरीही रस्त्यांचा वाढलेला दर्जा आणि त्यामुळे अपघातांचीही संख्या वाढतच असल्याने अपघातांची संख्या कमी होईल यावर काम करण्याची गरज आहे. आठवडाभर केवळ प्रबोधन करून अपघात कमी होणार नाहीत तर त्यासाठी ठोस कृतीचीच आवश्यकता आहे.नोव्हेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात हे उपक्रम होतात. यंदा शुक्रवारपर्यंत हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे, वाहतूक नियमांचे प्रबोधन, प्रचार आणि रस्ता सुरक्षेसाठीच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली जाते. याशिवाय अपघात झाल्यानंतर सर्वाधिक आवश्यकता असलेली वैद्यकीय मदत, पोलिसांचे सहकार्य, परिसरातील सामाजिक संघटनांचा पुढाकार व सर्वांना एकत्रित आणत सन्मान करण्यासाठी आठवडाभर कार्यक्रम होतच असतात.

अपघात टाळण्यासाठी उपाय काय?

अपघात होणारच नाहीत अशी आदर्श नियमावली असली तरी त्याचा अवलंब शक्यही नाही. त्यामुळे किमान अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. यात वाहतूक नियमांचे पालन, वाहनांची योग्य स्थिती, पात्र व्यक्तीलाच वाहतूक परवाना देणे, त्या त्या भागातील अपघात क्षेत्र निश्चित करून त्यावर उपाययोजना केल्यास निश्चितच अपघात टाळण्यास मदतच होणार आहे.

केवळ ‘इव्हेंट’ नसावा, प्रामाणिक प्रयत्न हवेतदरवर्षी अपघाताविषयी प्रबोधनासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला जातो. याशिवाय नोव्हेंबरमध्येही अपघातग्रस्तांना मदत, वाहतूक नियमांचे प्रसार, प्रचार आणि प्रबोधनावर भर दिला जातो. तरीही वर्षभर यात सातत्य दिसून येत नाही. त्यामुळेच हा केवळ ‘इव्हेंट’ न होता अपघात टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.

जिल्ह्यात दिवसाला दोन अपघातजिल्ह्यात वर्षभरातील अपघातांचा आढावा घेतला तर सातशेवर अपघातांची नोंद होते. त्यानुसार दिवसाला दोन अपघात होतातच. यात मृतांची संख्याही २७५ ते ३०० च्या दरम्यान असते. गेल्या तीन वर्षांपासून यातील संख्या वाढतच चालल्याने अपघातांची संख्या कमी होण्याची शक्यताच दिसून आली नाही.

गेल्या दहा महिन्यांतील अपघातांची संख्या

  • एकूण अपघात ५०५
  • अपघातात मृत्यू २२५
  • अपघातात गंभीर जखमी ४१३
  • अपघातात किरकोळ जखमी ३६
टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू