शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षीय पैलवानाचा ग्रामपंचायत निवडणुकीवेळी निर्घृण खून; दोन जण आले, दुचाकीवर बसवून नेले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 14:29 IST

राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात आकाश सक्रिय होता

मिरज : सोनी (ता. मिरज) येथे मंगळवारी मध्यरात्री आकाश माणिक नरुटे (वय २२) या पैलवानाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करून खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तम अशोक नरुटे (२१), दत्ताजी संभाजी कदम (२१), सम्मेद शांतिनाथ चौगुले (१८, रा. सर्व सोनी) या तिघांना अटक केली आहे.पैलवान असलेला आकाश भावासोबत शेती करीत होता. त्याचे काही दिवसांपूर्वी गावातील काहीजणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. सोनी येथे सध्या ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात सक्रिय असलेल्या आकाश यास सोमवारी (दि. १२) रात्री त्याच्याच भावकीतील उत्तम नरुटे याने बोलावून दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने नातेवाइकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर एका कोपऱ्यात आकाशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. हल्लेखोरांनी आकाशच्या डोक्यात पाठीमागील बाजूस धारदार कोयत्याने अनेक वार केल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.संशयितांकडून खुनाची कबुली घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आकाशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी आकाश यास दुचाकीवर बसवून नेणाऱ्या उत्तम नरुटे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सम्मेद चौगुले व दत्तात्रय कदम यांच्या मदतीने आकाशचा खून केल्याची कबुली दिली.

आकाश याच्या निर्घृण खुनामागे पूर्ववैमनस्य की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास सुरू असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खुनासाठी वापरलेला कोयता अद्याप सापडलेला नाही.सोनीत ग्रामपंचायत निवडणूक सुरू असून राष्ट्रवादीसमर्थक आकाश नरुटे या पैलवान तरुणाच्या खुनामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिस