सांगली: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी
By शीतल पाटील | Updated: August 30, 2022 19:30 IST2022-08-30T19:30:20+5:302022-08-30T19:30:49+5:30
पिडीत मुलीला पळून जावून लग्न करू या म्हणून तगादा लावला होता. अन् घरातून जबरदस्तीने घेऊन जात लैंगिक अत्याचार केले होते.

सांगली: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी
सांगली : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी किसन बलभीम देवकर (वय २३, रा. बजरंगनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) याला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
आरोपी किसन देवकर हा पिडीत मुलीला पळून जावून लग्न करू या म्हणून तगादा लावला होता. त्याने १० फेब्रुवारी २०२० मध्ये मुलीला रहात्या घरातून जबरदस्तीने घेऊन गेला. इचलकरंजी येथे एका भाड्याच्या खोलीत त्याने पिडीत मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.