शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील २० महिला डॉक्टर्स कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:24 IST

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २० विद्यार्थिनी डॉक्टर्स कोरोनाबाधित झाल्या आहेत.  

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली :  मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २० विद्यार्थिनी डॉक्टर्स कोरोनाबाधित झाल्या आहेत.  सोमवारी सायंकाळी चाचणी  अहवाल आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. 

वीस बाधितापैकी पंधरा आंतरवासिता डॉक्टर आहेत, तर पाच एमबीबीएसच्या तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. त्याना विलगीकरण कक्षात ठेवले असून उपचार सुरु आहेत. पंधरा डॉक्टर कोरोना कक्षात ड्युटी करत होत्या. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने आणि त्रास होऊ लागल्याने आरतीपीसीआर चाचणी करण्यात आली. सोमवारी सायंकाळी त्याचा अहवाल सकारात्मक आला. याच दरम्यान वसतिगृहातील आणखी पाच विद्यार्थिनींच्या चाचण्यांचा अहवालही सकारात्मक आला. ड्युटीवरील महिला डॉकटरांच्या संपर्कात आल्याने त्यादेखील बाधित झाल्याचा संशय आहे. 

दरम्यान, कोरोना कक्षातील महिला डॉक्टरांना अन्य कक्षात ड्युटी देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याची श्यक्यता नाही, पण त्यांच्या संपर्कात आलेल्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनी व सहकाऱ्यांनी स्वाबचे नमुने दिले आहेत. त्यांचा चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहे.  दरम्यान, रुग्णालयात सध्या सुमारे तीस कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असताना मोठ्या संख्येने डॉक्टर बाधित झाल्याने अस्वस्थता पसरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmiraj-acमिरजSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस