शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत व्हेल माशाची १९ कोटींची उलटी जप्त; तिघांना अटक, संशयित कोल्हापूर, मालवणचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:43 IST

मिरज शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

मिरज (जि.सांगली) : मिरजेत पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना मिरज शहर अटक करून त्यांच्याकडून तब्बल १९ कोटी २४ लाख किमतीची उलटी जप्त केली आहे. याप्रकरणी संशयित मंगेश माधव शिरवडेकर (वय ३६, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), संतोष ऊर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (३५, रा. वायरी मालवण ता. मालवण), वैभव भालचंद्र खोबरेकर (२९, रा. कवठे कुडाळ, देवबाग) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार फरारी आहे.

मिरजेतून कर्नाटकात तस्करी करण्यात येत असलेली जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी सोमवारी मध्यरात्री मिरज पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई मिरज शहर, गांधी चौक व मिरज वाहतूक पोलिसांनी वनविभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली.विशेष महानिरीक्षक फुलारी म्हणाले, व्हेल माशाची उलटी म्हणजेच ‘अंबरग्रीस’ची मिरजेतून कर्नाटकात विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे म्हैसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. मध्यरात्री अडीच वाजता मिरज म्हैसाळ रस्त्यावर वांडरे कॉर्नर येथे दुचाकी (एमएच १० डीपी ९७०८) आणि मोटार (एमएच ०७ एएस ०११७) आली असता या वाहनांना अडवून झडती घेण्यात आली. यावेळी वाहनात व्हेल माशाच्या उलटीच्या १९ किलो १७२ ग्रॅम वजनाच्या तीन लाद्या मिळाल्या. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य १९ कोटी १७ लाख २० हजार रुपये आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस