Sangli: मिरजेत व्हेल माशाची १९ कोटींची उलटी जप्त; तिघांना अटक, संशयित कोल्हापूर, मालवणचे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:42 AM2024-03-19T11:42:55+5:302024-03-19T11:43:12+5:30

मिरज शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

19 Crores seized from Miraj whale fish; Three arrested, suspects from Kolhapur, Malvan | Sangli: मिरजेत व्हेल माशाची १९ कोटींची उलटी जप्त; तिघांना अटक, संशयित कोल्हापूर, मालवणचे

Sangli: मिरजेत व्हेल माशाची १९ कोटींची उलटी जप्त; तिघांना अटक, संशयित कोल्हापूर, मालवणचे

मिरज (जि.सांगली) : मिरजेत पोलिसांनी व्हेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना मिरज शहर अटक करून त्यांच्याकडून तब्बल १९ कोटी २४ लाख किमतीची उलटी जप्त केली आहे. याप्रकरणी संशयित मंगेश माधव शिरवडेकर (वय ३६, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), संतोष ऊर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (३५, रा. वायरी मालवण ता. मालवण), वैभव भालचंद्र खोबरेकर (२९, रा. कवठे कुडाळ, देवबाग) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार फरारी आहे.

मिरजेतून कर्नाटकात तस्करी करण्यात येत असलेली जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी सोमवारी मध्यरात्री मिरज पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही कारवाई मिरज शहर, गांधी चौक व मिरज वाहतूक पोलिसांनी वनविभागाच्या पथकाला सोबत घेऊन केली.

विशेष महानिरीक्षक फुलारी म्हणाले, व्हेल माशाची उलटी म्हणजेच ‘अंबरग्रीस’ची मिरजेतून कर्नाटकात विक्रीसाठी तस्करी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे म्हैसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. मध्यरात्री अडीच वाजता मिरज म्हैसाळ रस्त्यावर वांडरे कॉर्नर येथे दुचाकी (एमएच १० डीपी ९७०८) आणि मोटार (एमएच ०७ एएस ०११७) आली असता या वाहनांना अडवून झडती घेण्यात आली. यावेळी वाहनात व्हेल माशाच्या उलटीच्या १९ किलो १७२ ग्रॅम वजनाच्या तीन लाद्या मिळाल्या. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य १९ कोटी १७ लाख २० हजार रुपये आहे.

Web Title: 19 Crores seized from Miraj whale fish; Three arrested, suspects from Kolhapur, Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.