शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

Independence Day (12590) सांगली जिल्ह्यातील १८६ जवानांनी दिले देशासाठी बलिदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 9:34 PM

सांगली : स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे मोलाचे योगदान आहे. गेल्या ७० वर्षांत जिल्ह्यातील १८६ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. आजही लष्कर, नौसेना, वायुसेना या तीनही दलात जिल्ह्यातील ६ हजार ५०० जवान सीमेवर शत्रूंशी दोन हात करीत असून, आजी-माजी ८० सैनिकांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावीर चक्र, वीर चक्र ...

ठळक मुद्देआजी-माजी ८० सैनिकांचा शौर्यपदकांनी गौरव : तीनही दलात ६५०० हजार सैनिक कार्यरत

सांगली : स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे मोलाचे योगदान आहे. गेल्या ७० वर्षांत जिल्ह्यातील १८६ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान दिले आहे. आजही लष्कर, नौसेना, वायुसेना या तीनही दलात जिल्ह्यातील ६ हजार ५०० जवान सीमेवर शत्रूंशी दोन हात करीत असून, आजी-माजी ८० सैनिकांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावीर चक्र, वीर चक्र आदी शौर्यपदकांनी गौरवही केला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुध्द केलेल्या चळवळीत पाचजण शहीद झाले आहेत. भूमी पादाक्रांत करण्याकरिता युद्ध होऊन त्या युद्धात या वीरांनी शौर्य गाजवले आहे. १९४८ पासून ते आजअखेरचा इतिहास पाहिल्यास प्रत्येक युध्दात सांगली जिल्ह्यातील सैनिकांनी हिरीरीने कामगिरी करून देश रक्षण करताना स्वत:चे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन व श्रीलंकेमधील बंडखोरांबरोबर झालेल्या युध्दात तसेच अतिरेक्यांबरोबर झालेल्या लढ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील १८६ जवानांनी आजपर्यंत बलिदान दिले आहे. देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आजपर्यंत विविध पदकांनी ७३ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. १९६२ मध्ये भारत-चीन युध्दात आठ वीरांनी प्राण खर्ची घातले आहेत. १९७१ मध्ये पाकबरोबर झालेल्या युध्दात शहीद झालेले मणेराजुरीचे जवान पांडुरंग साळुंखे यांना मरणोत्तर महावीरचक्र पदक देऊन गौरविण्यात आले. सांगली जिल्ह्यात आजपर्यंत वीरचक्र पदकाने ८, शौर्य पदकाने १, सेना, नौसेना पदकाने २४ माजी आणि सहा आजी सैनिकांचा गौरव केला आहे. युध्दसेवा पदकाने १, अतिविशिष्ट सेवा पदकाने ५ व मिशन इन डिस्पॅच शौर्य पदकाने ३० जवानांना सन्मानित करण्यात आले आहे. अति विशिष्ट सेवा पदक एका आजी सैनिकाने आणि सहा माजी सैनिकांनी पटकाविले आहे.सांगली जिल्ह्यातील माजी सैनिकांची संख्या १९ हजार ४८७ इतकी असून, दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या पाच हजार ४६१ इतकी आहे. वीर पत्नी ८१ आणि वीर माता १५, वीर पित्यांची संख्या सहा आहे. दुसऱ्या महायुध्दातील सैनिक व विधवांची ७७१ संख्या आहे. सीमेच्या रक्षणासाठी आजही सांगली जिल्ह्यातील सहा हजार ते सात हजार सैनिक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी दिली.

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व चळवळीतही सांगली जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. सुमारे पाच हजारहून अधिक ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी चळवळीत सहभाग घेतला.स्वातंत्र्य चळवळीत अनेक ज्ञात-अज्ञातांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपट देण्यात आले. सुरुवातीला जे स्वातंत्र्यसैनिक अपंग, निराधार होते, त्यांना दीडशे रुपये मानधन देण्यात येत होते. १९७० च्या सुमारास स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारस पत्नीस आता अठरा हजारांची पेन्शन देण्यात येते.ब्रिटिशांविरुध्दच्या युध्दात पाच स्वातंत्र्यसैनिक शहीदब्रिटिशांविरुध्द पुकारलेल्या युध्दात पाच स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले. यामध्ये हुतात्मा किसन अहिर, अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, शेगाव (ता. वाळवा) येथील रंगराव (दादा) पाटील व किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर कंपनीतील कर्मचारी उमाशंकर रेवाशंकर पंड्या यांचा समावेश आहे.तालुकानिहाय माजी सैनिक/विधवांची संख्या...तालुका माजी सैनिक विधवा एकूणआटपाडी ३०१ ७४ ३७५जत १५०९ ५३३ २०४२क़महांकाळ २९७२ ११४४ ४११६मिरज ३३१४ १६७७ ४९९१शिराळा ३९२ ७६ ४६८खानापूर ६८५ १६२ ८४७तासगाव २७४७ ९८५ ३४५९पलूस ४४४ १७३ ६१७कडेगाव ४२७ १०५ ५३२वाळवा १५०८ ५३२ २०४०एकूण १४०२६ ५४६१ १९४८७चौकटलढाई/मोहीमनिहाय शहीदयुध्द/आॅपरेशनचे नाव शहीद संख्याओपी बॅटल एक्स (१९४५-१९४७) ०१जे. जे. अ‍ॅन्ड के. आॅपरेशन (१९४८) ०१भारत-चीन युध्द (१९६२) ०८भारत-पाकिस्तान युध्द (१९६५) ३२भारत-पाकिस्तान युध्द (१९७१) ४८आॅपरेशन फॉलकॉन ०५आॅपरेशन पवन (श्रीलंका) ११आॅपरेशन मेघदूत ०७आॅपरेशन रक्षक २७आॅपरेशन आरचीड ०१आॅपरेशन हीनो ०८आॅपरेशन हिफाजत ०४आॅपरेशन पराक्रम ०२आॅपरेशन विजय (कारगिल) ०२अन्य विशेष आॅपरेशन २९एकूण १८६ 

सैन्यातील जिल्ह्याचा टक्का घसरतोयसैन्याच्या तिन्ही दलात पाच वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील सैनिकांची संख्या नऊ हजारापर्यंत होती. सध्याची आकडेवारी पाहिल्यास, ती सहा ते सात हजारापर्यंतच आहे. म्हणजेच दोन ते तीन हजाराने सैन्यातील जिल्ह्यातील सैनिकांची संख्या घटलेली आहे. सैन्यदलात जाणाºयांची संख्या घटत आहे, ही चिंतेची बाब आहे. सैन्यदलाबाबत तरुणांमध्ये गोडी निर्माण झाली पाहिजे, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत आहोत. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे. माझी कन्या हिमीका कल्याणी मेजर असून ती सध्या हैदराबाद येथे कार्यरत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा सैनिक कल्याणचे कर्नल बी. डी. कल्याणी यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीIndependence Dayस्वातंत्र्य दिवसIndiaभारत