शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget २०२५: सांगलीतील म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालविण्यासाठी १८०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:47 IST

संख येथे प्रकल्पाची उभारणी

सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ७९४ कोटी रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. अर्थमंत्री अजित पवार यांनी तशी घोषणा केली.म्हैसाळ सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आर्थिक तरतूद मात्र आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

योजनेच्या वीजबिलाचा शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. शासनाने १८ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मान्यता दिली होती. या प्रकल्पाद्वारे २०० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे. ती सिंचन योजनेसाठी वापरली जाईल. प्राथमिक अंदाजानुसार त्याचा खर्च १४४० कोटी रुपये होता. मात्र अर्थसंकल्पात १७९४ कोटींची तरतूद करण्यात आल्याचे पवार यांनी जाहीर केले. या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी २०० मेगावॉट सौरऊर्जा ही उपसा सिंचन योजनेसाठी वापरली जाणार आहे. त्याकरिता रु. १४४० कोटी इतका खर्च येईल. या प्रकल्पाकरिता जत तालुक्यातील संख येथील सरकारी जमीन निश्चित करण्यात आलेली आहे.

वर्षाचे वीजबिल सुमारे १८४ कोटीम्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने एक वर्षासाठी कार्यान्वित करायची झाल्यास ३९८ दशलक्ष युनिट वीज वापरली जातेे. प्रचलित पद्धतीनुसार, या विजेचा खर्च सुमारे १८४ कोटी रुपये होतो. यापैकी १२१ कोटी रुपये शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळतात, तर उर्वरित ६३ रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करून कृष्णा खोरे महामंडळ भरते. योजना सौरऊर्जेवर कार्यान्वित झाल्यास हा खर्च वाचणार आहे.

टेंभू, विस्तारित म्हैसाळचे काय?विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना व जतसाठीची विस्तारित म्हैसाळ योजना या प्रकल्पांसाठीही ३०० मेगावॉट क्षमतेच्या वीज प्रकल्पाची गरज आहे. त्यासाठी तरतूद अद्याप झालेली नाही.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Ajit Pawarअजित पवारWaterपाणी