शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नोकरीच्या आमिषाने १८ लाखांना गंडा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:07 IST

कवठेमहांकाळ : तलाठी पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तीन जणांना १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसात दोघा जणांविरुद्ध ...

कवठेमहांकाळ : तलाठी पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तीन जणांना १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास बापू पाटील (रा. कुकटोळी, ता. कवठेमहांकाळ) प्रवीण गुंडा होनराव, (रा महांकाली मंदिराजवळ कवठेमहांकाळ) असे गुन्हा दाखल केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी धनश्री मंगेश पाटील (वय २७, रा. दिघी, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.विकास पाटील यांनी महसूल खात्यातील तलाठी पदाची नोकरी लावतो. असे म्हणून धनश्री पाटील यांच्याकडून ९ लाख रुपये तर संजय यल्लाप्पा रायपुरे यांना त्यांच्या पत्नीस भरती करतो असे भासवून ५ लाख रुपये तर अन्य एका युवतीकडून ४ लाख रुपये घेतले आहेत. एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत विकास पाटील व प्रवीण होनराव यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरले आहेत. परीक्षेच्या कालावधीनंतर या तिघांनी विकास पाटील व प्रवीण होनराव यांना नियुक्तीसंदर्भात वारंवार विचारणा केली असता त्यांनी निवड झाल्याबाबत शासनाची मोहर असलेली नियुक्तीपत्रे पाठवले.मात्र, त्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर अजूनही नियुक्ती होत नाही हे दिसल्यावर या तिघांनी त्यांना नियुक्ती करून द्या, असा तगादा लावला. मात्र, त्यानंतरही त्यांनी नियुक्ती केली नसल्यामुळे दिलेले पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या तिघांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कवठेमहांकाळ पोलिसात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत धनश्री पाटील यांच्या फिर्यादीनुसार विकास पाटील व प्रवीण होणाराव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस