शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज 

By अशोक डोंबाळे | Updated: December 3, 2022 17:04 IST

अर्ज माघार घेण्यासाठी दि. ७ डिसेंबरपर्यंत मुदत. यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार

सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींमधील १ हजार ५८८ प्रभागांतील सरपंचासह चार हजार ६५६ जागांसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी दोन हजार ४८२ तर सदस्यपदासाठी १६ हजार ९५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वाळवा तालुक्यातून सर्वाधिक सरपंचासह सदस्यपदासाठी तीन हजार ६७२ अर्ज दाखल झाले. या अर्जाची छाननी सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी असून, बुधवार, दि. ७ डिसेंबर अर्ज माघारीची मुदत आहे. यानंतरच निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. सर्व्हर डाऊनची अडचण दूर करत ऑफलाइन अर्ज स्वीकारल्याने उमेदवारांची गैरसोय दूर झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या केंद्रात प्रचंड गर्दी होती. वेळेपूर्वी आत आलेल्या सर्वांचे अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. त्यामुळे एकूण दाखल अर्जाची मोजणी करण्यात प्रशासनाला रात्री बारापर्यंत जागावे लागले. ४४७ गावच्या सरपंचपदासाठी एकूण दोन ४८२ तर सदस्यपदासाठी १४ हजार ४६९ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. वाळवा तालुक्यातून सरपंचपदासह सदस्यासाठी सर्वाधिक तीन हजार ६२७ अर्ज आले आहेत. सोमवार, दि. ५ डिसेंबरला छाननी प्रक्रिया होणार असून, अर्ज माघार घेण्यासाठी दि. ७ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

रात्री उशिरापर्यंत प्रशासन जागेअर्ज दाखल करण्यासाठी ऑफलाइन परवानगी दिल्यामुळे शेवटच्या दिवशी शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती. साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रात उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या अर्ज घेण्यात आले. गेल्या पाच दिवसांत आलेल्या एकूण अर्जाची नोंद करून एकत्रित माहिती करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत निवडणूक कामकाजासाठीचे कर्मचारी, अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण या स्वतः रात्री शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होत्या.

तालुकानिहाय अर्ज दाखल संख्या

तालुका सरपंच सदस्य
मिरज २१९ १५८६
तासगाव १५६ ८६०
क. महांकाळ १६७ १००४
जत  ४२८ २३४९
खानापूर १९९ ९७२
आटपाडी १४५ ८५१
पलूस १३४ ७७०
कडेगाव २६७  १३१४
वाळवा ४४५ ३१८२
शिराळा ३२२ १५८१
एकूण २४८२ १४४६९

 

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक