Sangli News: सात बाजार समित्यांच्या १२६ जागांसाठी १३२८ अर्ज
By अशोक डोंबाळे | Updated: April 4, 2023 13:51 IST2023-04-04T13:50:42+5:302023-04-04T13:51:11+5:30
पलूस, शिराळा, इस्लामपूर, विटा, आटपाडी बाजार समितीसाठी चुरशीने अर्ज दाखल

Sangli News: सात बाजार समित्यांच्या १२६ जागांसाठी १३२८ अर्ज
सांगली : जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी अर्ज दाखलच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १२६ जागांसाठी १३२८ अर्ज दाखल झाले. माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, बाजार समित्यांच्या माजी संचालकांनीही अर्ज दाखल केले आहेत.
सातही बाजार समिती कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सव्वा वर्षापासून लांबल्या आहेत. त्याआधी बाजार समितीमध्ये संचालक होण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ४१३ जणांनी अर्ज दाखल केले. अद्याप कोणत्याच पक्षाचे चित्र स्पष्ट नसल्यामुळे, सर्वच पक्षांतून अर्ज दाखल झाले आहेत.
पलूस, शिराळा, इस्लामपूर, विटा, आटपाडी बाजार समितीसाठी चुरशीने अर्ज दाखल झाले.
दाखल उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी, दि. ५ रोजी होणार आहे. अर्ज माघारीची मुदत दि. २० एप्रिलपर्यंत आहे.
बाजार समित्यांसाठी दाखल अर्ज
बाजार समिती -एकूण अर्ज
सांगली ५९८
तासगाव १६८
आटपाडी १६७
इस्लामपूर ९६
शिराळा ५९
पलूस १२४
विटा ११६