शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

gram panchayat election: सांगलीतील कडेगावच्या दोन गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:43 IST

कडेगाव तालुक्यातील दोन गावांनी मूलभूत सुविधांसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.

सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सरपंच आणि सदस्यपदांसाठी विक्रमी १३ हजारांवर अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होती. कडेगाव तालुक्यातील दोन गावांनी मूलभूत सुविधांसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. काही गावच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी दिवसभर हालचाली चालू होत्या.जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता; पण हरिपूरसह पाच गावांनी आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतल्यामुळे त्या ग्रामपंचायतींना सध्याच्या ग्रामपंचायत कार्यक्रमातून वगळले आहे. त्यामुळे सध्या ४४७ ग्रामपंचायतींमधील १ हजार ५८८ प्रभागांतील सरपंचासह चार हजार ६५६ जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखलची प्रक्रिया चालू होती. काही इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. सरपंचासह सदस्य पदासाठी १३ हजारांवर अर्ज दाखल झाले असण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली आहे. कडेगाव तालुक्यातील उपाळे (मायणी) आणि शाळगाव येथून एकही अर्ज दाखल नाही. गावांमधील मूलभूत सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालत असल्याचा पवित्रा गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. वाळवा, जत, आटपाडी, मिरज, शिराळा, खानापूर, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ आणि पलूस तालुक्यातील दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. काही जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या अशा आहेत जागा

तालुका ग्रामपंचायती सरपंचसदस्य 
मिरज ३६   १५४  ४५२
तासगाव २६  ९६२८८
क. महांकाळ २८  ९९  २७०
जत  ८१ २७४ ८२८
खानापूर ४५ १४३  ४२४
आटपाडी २५ ८२ २५४
पलूस १५ ६३ १८६
कडेगाव ४३ १४७ ४४०
वाळवा ८८ ३३५ १०१०
शिराळा ६०१९५  ५०४
एकूण ४४७ १५८८ ४६५६

 

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक