शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १२०० गुन्हेगार ‘वॉन्टेड’

By admin | Updated: August 28, 2015 22:59 IST

संथगतीने शोध : परराज्यातील संख्या मोठी; यादी वाढत चालली

सचिन लाड- सांगली  --जिल्ह्यात विविध गुन्ह्यांतील सुमारे बाराशे गुन्हेगार फरारी आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांकडून या गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने दिवसेंदिवस फरारी गुन्हेगारांची यादी वाढतच आहे. केवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागच फरारींना पकडत आहे. बाराशेपैकी सातशे गुन्हेगार परराज्यातील आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे व त्यांना पकडणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे फरारी गुन्हेगारांची यादी कधीच कमी होताना दिसत नाही.गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचा आलेख वाढत गेला आहे. गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत सातत्याने बदलत आहे. या गुन्हेगारांना पकडणे आणि गुन्हा उघडकीस आणणे फार कठीण बनले आहे. यातच अनुभवी पोलिसांचीही कमतरता आहे. परराज्यातील गुन्हेगारांनी जिल्ह्यात शिरकाव केला आहे. गुन्हा केला की, पाच-दहा मिनिटात ते जिल्ह्याबाहेर निघून गेलेले असतात. त्यामुळे त्यांची काहीच माहिती नसते. यातूनच खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, मारामारी, दरोडा, वाटमारी, खंडणी, अपहरण, फसवणूक यांसह अनेक गुन्ह्यांतील बाराशे गुन्हेगार वॉन्टेड आहेत. त्यांना पकडण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषणची असल्याने स्थानिक पोलीस शांत आहेत. बाराशेपैकी सातशे गुन्हेगार परराज्यातील आहेत. अनेकदा संपूर्ण टोळी कधीच पोलिसांच्या हाताला लागलेली नाही. एक-दोन गुन्हेगारांना पकडायचे राहतेच. पुन्हा या प्रकरणाकडे लक्ष दिले जात नाही. एखादा गुन्हेगार सापडत नसेल, तर त्याला फरारींच्या यादीत टाकले जाते. परराज्यातील गुन्हेगारांना पकडणे फार कठीण बनले आहे. त्यांची माहिती काढणे, तिथंपर्यंत जाणे, तेथील पोलीस सहकार्य करतील का नाही, जाताना किमान चार-पाच पोलिसांचे पथक, सुसज्ज वाहन या सर्व गोष्टींची गरज आहे. परंतु दररोज नवीन काही तरी काम समोर येत असल्याने, फरारी गुन्हेगारांना पकडण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वाळवा तालुक्यातील गुंड भावश्या पाटील यास मोठ्या शिताफीने पकडले. मात्र न्यायालयात नेताना तो फरार झाला. या घटनेला पाच वर्षे होऊन गेली तरी त्याची काहीच खबर नाही.साठ गुन्हेगारांना पकडलेजिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने गेल्या तीन महिन्यात विविध गुन्ह्यांतील ६० गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. या गुन्हेगारांना गुन्हा दाखल असलेल्या संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजूनही त्यांच्याकडून फरारींचा शोध घेतला जात आहे.