शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं मूल असं दु:खी का दिसतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 17:50 IST

त्याला डिप्रेशनही आलेलं असू शकतं..

ठळक मुद्देसर्वसामान्य आजारांप्रमाणे मुळात डिप्रेशन हादेखील एक आजार आहे, हे आपण मान्य करायला हवं.मुलाला जर खरंच डिप्रेशनचा आजार झाला असेल, आधी त्यासाठी त्याला चांगला डॉक्टर आणि सर्पोटिव्ह पॅरेंट मिळणं आवश्यक आहे.डिप्रेशन का येतं, त्याची कारणं काय, त्याची लक्षणं काय, परिणाम काय आणि त्यावरचे उपाय काय.. सारखी माहिती पालकांनी मिळवली पाहिजे.

- मयूर पठाडेमुलांकडे पाहिल्यावर आपल्यालाही कसं प्रसन्न वाटतं. दिवसभराचा आपला थकवा, टेन्शन कुठल्याकुठे पळून जातो आणि पुन्हा नव्या आव्हानांसाठी आपण सज्ज होतो.. पण मुलांचं काय? हल्ली मुलं दिसतात प्रसन्न, उत्साही? लहान मुलांना कसलं आलंय टेन्शन असं आपल्याला वाटतं, पण जगभरातले विविध अभ्यास सांगतात, मुलांनाही खूप टेन्शन असतं. अनेक कारणांनी त्यांचं बालपण हिरावलं जातंय.. आजकाल लहान मुलंच नाहीत, तरुणांमध्येही हे डिप्रेशन मोठ्या प्रमाणावर सध्या दिसतंय.का होतंय असं? काय करायचं त्यासाठी? मुलं आनंदी असली तर त्याचा त्यांच्या आयुष्यावरच सकारात्मक परिणाम होतो आणि अख्खं घरच त्यामुळे आनंदी होतं, पण त्यासाठी पालक म्हणून थोडे प्रयत्न करायची गरज आहे.मुलं डिप्रेस्ड असली, तर काय कराल?१- सर्वसामान्य आजारांप्रमाणे मुळात डिप्रेशन हादेखील एक आजार आहे, हे आपण मान्य करायला हवं. अनेक पालकांना वाटतं, या वयातील मुलांना डिप्रेशनचा आजार होऊच शकत नाही. त्यामुळे एकतर ते त्याकडे दुर्लक्ष करतात, किंवा त्या मुलावरच राग काढतात. आजाराची शंका आधी दूर केली पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांकडून मुलाची तपासणीही करून घ्यायला हवी.२- मुलाला जर खरंच डिप्रेशनचा आजार झाला असेल, आधी त्यासाठी त्याला चांगला डॉक्टर आणि सर्पोटिव्ह पॅरेंट मिळणं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी पालक म्हणून आपल्याच हातात आहेत. याच काळात मुलांना पालकांच्या पठिंब्याची सर्वाधिक गरज असते. त्यांची ही गरज अत्यंत जबाबदारीनं आपण निभवायला हवी.३- त्यासाठी थोडा होमवर्कही हवा. म्हणजे डिप्रेशन का येतं, त्याची कारणं काय, त्याची लक्षणं काय, परिणाम काय आणि त्यावरचे उपाय काय.. सारखी माहिती पालकांनी मिळवली पाहिजे आणि त्यासाठी तसं वाचन करणं, तज्ञांकडून, अभ्यासकांकडून, परिचितांकडून माहिती मिळवणं आवश्यक ठरतं. कारण त्यामुळे आपल्याला काय करायला हवं याबद्दलची पालकांची मानसिकताही त्यामुळे तयार होते. मुलांच्या भवितव्यासाठी त्याचा उपयोग होतो.४- आपल्या मुलाला डिप्रेशनचा आजार झालेला असू शकतो, हे पालकांनी जसं लक्षात घेणं गरजेचं आहे, तसंच डिप्रेशन येणं म्हणजे खूप वाईट आहे, ते जगावेगळं आहे असं मुलांना वाटत असेल तर त्याबाबतचा त्यांचा गैरसमजही आपण दूर केला पाहिजे. मुलांच्या पाठीशी उभं राहाताना त्यांना तसा विश्वास आपण द्यायला हवा.मुलांना पुन्हा हसरंखेळतं पाहायचं असेल तर या गोष्टी आपल्याला करायलाच हव्यात. आणखी काही गोष्टी पाहू या पुढील भागात..