...म्हणून मुलं कमी उंचीच्या मुलींकडे आकर्षित होतात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 14:47 IST2018-08-01T14:46:15+5:302018-08-01T14:47:03+5:30
प्रत्येक मुलाला आपल्या पार्टनरबाबत अपेक्षा असतात. काही मुलं दिसण्यावरून आपला पार्टनर सिलेक्ट करतात. तर काही मुलं त्यांच्या स्मार्टनेसवरून निवड करतात.

...म्हणून मुलं कमी उंचीच्या मुलींकडे आकर्षित होतात!
प्रत्येक मुलाला आपल्या पार्टनरबाबत अपेक्षा असतात. काही मुलं दिसण्यावरून आपला पार्टनर सिलेक्ट करतात. तर काही मुलं त्यांच्या स्मार्टनेसवरून निवड करतात. पण एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, जास्तीत जास्त मुलं आपल्यापेक्षा कमी उंची असलेल्या मुली किंवा त्यांच्या बरोबरीची उंची असेलेल्या मुलींची निवड करतात. तेच जास्त उंची असलेल्या मुलींसोबत फक्त चांगली मैत्री करतात. जाणून घेऊयात यामागील कारणं...
1. असं म्हटलं जात की, जास्त उंचीच्या मुली इतर मुलींच्या तुलनेत जास्त स्मार्ट असतात. मुलांची अशी इच्छा असते की, त्यांची पार्टनर त्यांच्यापेक्षा जास्त स्मार्ट नसावी. कारण त्यामुळे त्यांचं महत्त्व कमी होतं.
2. कमी उंचीच्या मुलींकडे मुलं लगेच आकर्षित होतात. जेव्हाही मुलं कमी उंचीच्या मुलींसोबत फिरायला जातात त्यावेळी लोकांचे लक्ष त्यांच्यापेक्षा त्यांच्या पार्टनरकडे पटकन जातं.
3. डोळे शरीराचा असा भाग आहे, ज्याकडे लगेच कोणतीही व्यक्ति आकर्षित होते. तसेच मुलं मुलींच्या डोळ्यांवरून त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि स्वभावाबाबत जाणून घेतात. परंतु, जास्त हाइट असणाऱ्या मुलींशी मुलांचा आय कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही.
4. कॉलेज लाइफमध्ये मुलं आपल्या पर्सनॅलिटीची फार काळजी घेतात. जेव्हा मुलं उंच मुलींना डेट करतात. त्यावेळी त्यांचे मित्र त्यांची फार खिल्ली उडवतात. त्यामुळे आपली पर्सनॅलिटी जपण्यासाठी कमी उंचीच्या मुलींना पार्टन म्हणून सिलेक्ट करतात.