लॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:22 IST2020-04-01T13:16:58+5:302020-04-01T13:22:55+5:30
सध्या लॉकडाऊनमुळे कोणताही ऑप्शन नाही म्हणून अनेक पती- पत्नी २४ तास घरातचं आहेत. अशा स्थितीत भांडणं हमखास होतात.

लॉकडाऊनमध्ये घरात सतत भांडणं होत असतील, तर 'या' ट्रिकने आपलं टेंशन घालवा...
सर्वाधिक वेळ एखाद्या बंद खोलीत राहिल्यामुळे भांडण होण्याची शक्यता असते. नातं कितीही घट्ट असलं तरी वाद व्हायचे तेव्हा होतातच. प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पध्दत वेगळी असते. त्यामुळे पार्टनरच्या बोलण्याचं वाईट सुद्धा वाटू शकतं. सध्या लॉकडाऊनमुळे कोणताही ऑप्शन नाही म्हणून अनेक पती- पत्नी २४ तास घरातचं आहेत. अशा स्थितीत भांडणं हमखास होतात. तुम्हाला होणारं भांडण थांबवायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे लॉकडाऊनमध्येही तुम्ही हॅप्पी राहू शकता.
पार्टनरला पर्सनल स्पेस द्या
लॉकडाऊनच्या काळात सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे तुम्ही एकमेकांना पर्सनल स्पेस देणं गरजेचं आहे. जर तुम्ही होम क्वारंटाईन असाल तर तुमचा छंद जोपासा, वेगळं काही तुमचा मुड फ्रेश होईल असं करा. नेहमी एकत्रित राहण्याची काही गरज नाही. जितका वेळ तुम्ही वेगळा आणि स्वतःला द्याल तेवढं चांगलं फिल कराल.
समजदारीने वागा
घरी असताना लहान लहान गोष्टींवर चिडण्यापेक्षा समजदारीने वागा. त्यामुळे शांतता टिकून राहिल. शांततेत बोलाल तर तुम्हाला असं वाटेल की एकमेकांची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. कारण सतत रागाचे विचार तुम्हाला मानसिकरित्या डिस्टर्ब करणारे असतील. लहान लहान गोष्टींवरून प्रश्न विचारणं बंद करून तुमच्या पार्टनरला हवा तसा वेळ घालवू द्या.
काळजी घ्या
लॉकडाऊनमध्ये पार्टनरसोबत भांडण होऊ नये यासाठी एकमेकांशी बोलून जुन्या आठवणी ताज्या करा. सोबत गेम खेळण्यापासून, सिनेमा पाहण्यापर्यंत प्रत्येकक्षण इन्जॉय करा. पार्टनरच्या आवडीचे जेवण तयार करा. जुने मजेशीर किस्से आठवून शेअर करा. या पध्दतीने तुम्ही आपल्या पार्टनरसोबत लॉकडाऊन इन्जॉय कराल तर भांडणं विसरून जाल.