वॉर्नचे अजब किस्से...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 00:59 IST2016-02-23T07:59:51+5:302016-02-23T00:59:51+5:30
मैदानावरील धडाकेबाज कामिगिरीबरोबरच मैदान आणि मैदानाबाहेरील वाईट कृत्या मुळेही हा क्रिकेटपटू कायम चर्चेत असायचा.

वॉर्नचे अजब किस्से...
मर्लोन सॅमुअल्स
२०१३ मध्ये बिग बॅश टी-२० स्पर्धे दरम्यान वेस्ट इंडिज चा धडाकेबाज अष्टपैलू मर्लोन सॅमुअल्स आणि वॉर्न भर मैदानावर एकमेकांसोबत भिडले होते. सामन्यात वॉर्नने सॅमुअल्सच्या दिशेने चेंडू मारून फेकल्यानंतर हि घटना घडली होती.
स्टिव्ह वॉ
स्टिव्ह वॉ आणि वॉर्न यांचे कोल्ड वॉर १७ वर्षे जुने आहे. एका मालिकेदरम्यान वॉ कर्णधार असताना त्याने उपकर्णधार वॉर्नला संघातून वगळले होते. या घटनेमुळे दोघांचे फाटले. अलीकडेच वॉर्नने वॉबद्दल 'मी पाहिलेला सर्वांत स्वार्थी कर्णधार' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती.
अर्जुन रणतुंगा
१९९९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धे च्या फायनलमध्ये आॅस्ट्रेलियावर बाजी मारली होती. तेव्हापासून अर्जुन आणि वॉर्नचे बिनसले.
लिझ हर्ले
ही वॉर्नची एकेकाळची प्रेयसी. सुमारे २ वर्षे ते अफेयर टिकले. याच काळात वॉर्न चे मिशेल मॉससोबत संबंध असल्याचे लिझ ला आढळले. अखेर या दोघांचे ब्रेक अप झाले.