Valentines Week 2021 : 'व्हेलेंटाईन वीक'ची लिस्ट पाहा अन् संपूर्ण आठवड्याभर करा रोमॅन्टिक सेलिब्रेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 14:56 IST2021-02-06T14:23:49+5:302021-02-06T14:56:53+5:30
Valentines Week 2021in marathi : धकाधकीच्या आयुष्यात आपल्या पार्टनरसाठी काही स्पेशल करण्याची संधी तुम्हाला या दिवसात मिळू शकते.

Valentines Week 2021 : 'व्हेलेंटाईन वीक'ची लिस्ट पाहा अन् संपूर्ण आठवड्याभर करा रोमॅन्टिक सेलिब्रेशन!
दरवर्षी फेब्रुवारी महिना आल्यानंतर व्हेलेंटाईन वीकची (Valentine Day Date) चाहूल लागते. आपल्या प्रियजनांसह आनंद साजरा करण्यासाठी ही उत्तम संधी असते. फेब्रुवारी आल्यानंतर प्रत्येकालाच आपली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असावा असं वाटत असतं. धकाधकीच्या आयुष्यात आपल्या पार्टनरसाठी काही स्पेशल करण्याची संधी तुम्हाला या दिवसात मिळू शकते.
कोरोनाकाळात अनेकांना ताण तणावाच्या प्रसंगांचा सामना लोकांना करावा लागला होता. आता व्हेलेंटाईन वीकच्या निमित्तानं पार्टनरला सरप्राईज देऊन तुम्ही आनंद साजरा करू शकता आज आम्ही तुम्हाला कोणत्या दिवशी काय साजरं केलं जाणार आहे याबाबत अधिक माहिती देणार आहोत.
Valentine's Day 2021 चं संपूर्ण वेळापत्रक
रविवार: Rose Day 2021 - 7 फेब्रुवारी 2021 - रोझ डे
सोमवार: Propose Day 2021- 8 फेब्रुवारी 2001 - प्रपोझ डे
मंगळवार: Chocolate Day 2021- 9 फेब्रुवारी 2021 - चॉकलेट डे
बुधवार: Teddy Day 2021- 10 फेब्रुवारी 2021 - टेडी डे
गुरूवार: Promise Day 2021- 11 फेब्रुवारी 2021- प्रॉमिस डे
शुक्रवार: Hug Day 2021- 12 फेब्रुवारी 2001 - हग डे
शनिवार: Kiss Day 2021- 13 फेब्रुवारी 2021 - किस डे
रविवार: Valentine's Day 2021- 14 फेब्रुवारी 2021 - व्हॅलेंटाईन डे
तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीला मागणी घालू इच्छित असाल तर यापेक्षा जास्त चांगली संधी मिळणार नाही. गिफ्ट्स देऊन किंवा आपल्या प्रियजननांना वेळ देऊन तुम्ही आनंद साजरा करू शकता.