पार्टनरवर कितीही करा प्रेम, पण 'या' गोष्टी जुळत नसतील तर सगळंच बिघडू शकतं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:35 IST2019-08-23T12:29:22+5:302019-08-23T12:35:45+5:30
जर दोन्ही पार्टनरचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी जुळत नसतील तर दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात याने काहीही फरक पडत नाही.

पार्टनरवर कितीही करा प्रेम, पण 'या' गोष्टी जुळत नसतील तर सगळंच बिघडू शकतं!
(Image Credit : www.cheatsheet.com)
जर दोन्ही पार्टनरचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी जुळत नसतील तर दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात याने काहीही फरक पडत नाही. अशा स्थितीत काही दिवसांनी प्रेम ओझं वाटू लागतं. त्यामुळे अशात नात्यात अडकण्यापूर्वी चारदा विचार करणे महत्त्वाचे ठरेल. चला जाणून घेऊन कोणत्या गोष्टी न जुळल्याने तुमचं नातं किंवा प्रेम तुम्हाला ओझं वाटू लागेल.
भविष्याबाबत विचार
जर तुमचे आणि तुमच्या पार्टनरचे भविष्याबाबतचे विचार पूर्णपणे वेगळे असतील तर ही धोक्याची घंटा आहे. कारण लग्न आणि नंतर मुलांबाबत कपलचे विचार एकसारखे असले पाहिजे, असं असेल तर जीवन सोपं होतं. नाही तर या गोष्टींवरून तुमच्या सतत खटके उडत राहतील.
भांडणाची शुल्लक कारणे
भांडणं तर प्रत्येक कपलमध्ये होतात. पण जर ही भांडणं जर समजदारीने सोडवली गेली तर चांगलं राहतं. पण भांडणाचं मूळ दूर न करता केवळ सगळं काही ठीक असल्याचा दिखावा केला जात असेल तर महागात पडू शकतं. याचा अर्थ तुमच्या दोघांचे विचार जुळत नाहीत.
दिखावा करणे
जेव्हा तुम्ही पार्टनरसोबत असता तेव्हा खोटा आनंद किंवा खोटं हसू दाखवता आणि आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. अशात किती दिवस असं भावना दाबून ठेवून तुम्ही जगू शकणार? असा प्रश्न स्वत:ला विचारावा.
तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष
तुमच्या पार्टनरला तुमच्या भावनात्मक किंवा फिजिकल कोणत्याही गरजांची काहीच काळजी नसते का? नेहमी तुम्हीच नातं अधिक चांगलं करण्यासाठी पुढाकार घेता? असं होत असेल तर पुन्हा एकदा या नात्याबाबत विचार करणे महत्त्वाचे ठरेल.
वेगळ्या आवडी-निवडी
दोन लोकांच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असणे सामान्य बाब आहे. पण तुम्ही दोघे कोणतच काम सोबत करत नसाल तर हे जरा विचित्र आहे. सोबत असूनही दोघे वेगवेगळा वेळ घालवत असाल तर संपूर्ण आयुष्य सोबत कसं घालवाल?