प्रत्येक रिलेशनशिप हे प्रेम आणि विश्वासावरचं टिकलेलं असतं जगातील खूप कमी व्यक्ती असे आहेत. जे आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये तसंच लव्ह लाईफमध्ये खोटं बोलत नसतील. गर्लफ्रेंड असो किंवा बॉयफ्रेंड अनेकदा एकमेकांशी सर्रास खोटं बोलतात. पण याबाबतीत मुली सगळ्यात पुढे आहेत. अनेक मुली काही कॉमन गोष्टींबात खोटं बोलतात. पण पार्टनरला ते नेहमी खरं वाटतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबाबत सांगणार आहोत.

Related image(image credit- elitedaily.com)

मी स्वतःकडे लक्ष देत नाही

Related image

अनेक मुली आपल्या पार्टनरला मी स्वतःकडे लक्ष देत नाहीत असं वारंवारं सांगत असतात. तुम्हालाही तुमची पार्टनर असं बोलत असेल तर समजून जा की ती खोटं बोलत आहे. खरं पाहता मुली अट्रॅकटिव्ह दिसण्यासाठी स्वतःला वेळ देतात. स्वतःवर  मेहनत घेतात.  पण एकिकडे हीच  गोष्ट मुलींना लपवायची सुद्धा असते. म्हणून पार्टनरशी खोटं बोलतात. 

स्वतःच्या ड्रेसिंगला नावं ठेवणं

कोणतंही वेगळं ड्रेसिंग किंवा मेकओव्हर केला असेल तर मुलींना आपल्या पार्टनरच्या तोंडून कौतुक ऐकायचं असतं. म्हणून मुली स्वतःला नाव ठेवतात. जेणेकरून पार्टनर त्यांचं म्हणणं खोट ठरवेल आणि कौतुक करेल. म्हणून मुली याबाबतीत मुलांशी खोट बोलतात. 

राग आला नसल्याचे खोटं सांगणे

मुलींना अनेकदा मनातील गोष्टी मोकळेपणाने बोलायला आवडत नाहीत. नेहमी आपलं ४ गोष्टींपैकी २ गोष्टी आपल्या पार्टनरला मोकळेपणाने सांगतात. त्यांना असं वाटत असतं की आपल्या पार्टनरने न सांगताच आपल्या मनातील गोष्टी ओळखायला हव्यात म्हणून  राग आला असेल तरी पटकन व्यक्त होत नाहीत.

मला काही प्रोब्लेम नाही

बॉयफ्रेंड त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जात असताना  मला काही प्रोब्लेम नसल्याचा अविर्भाव मुलींचा असतो. पण अनेकदा मुलींना आपल्या पार्टनरचं इतरांसोबत फिरायला जाणं आवडत नसतं. हेच कारण ब्रेकअपचं कारण ठरू शकतं. 

(...म्हणून स्वतःपेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत रिलेशनमध्ये असतात मुलं)

('या' राशीच्या मुली असतात सगळ्यात जास्त संशयी; पार्टनरवर जराही नसतो विश्वास )

Web Title: These lies of girlfriends which every boyfriend believes to be true myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.