...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:37 PM2019-08-28T12:37:23+5:302019-08-28T12:40:20+5:30

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच.

Study on most people stay in an unhappy and unsatisfying relationship | ...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक!

...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक!

Next

प्रत्येकाचीच इच्छा असते की, त्यांचं आणि त्यांच्या जोडीदाराचं नातं प्रेम, आपुलकी आणि आनंदानेच भरलेलं असावं. परंतु, असं अजिबात शक्य नाही. कोणतंही नातं म्हटलं की, त्यामध्ये प्रेमासोबतच भांडणंही आलीच. एवढचं नाहीतर नात्यामध्ये चढउतारही येतात. कधीकधी तर अशी परिस्थिती उद्भवते की, त्यामध्ये नात्याबाबात टोकाचा निर्णयही घ्यावा लागतो. पण तरिही अनेकजण या परिस्थितीतून मार्ग काढतात आणि आपलं नातं टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

मग प्रश्न असा उद्भवतो की, ज्यामध्ये प्रेम नाही किंवा नुसतं भांडणं होतात. तर लोक का असं नातं टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात? अनेकांना हा प्रश्न पडतो. त्यांच्या याच प्रश्नाचं उत्तर काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. 

पर्सनॅलिटी आणि सोशल सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, जास्तीत जास्त लोक रोमॅन्टिक नसतानाही आपल्या पार्टनरसाठी नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा नात्यामध्ये दुःखी असूनही ते नातं तोडण्याचा निर्णय घेतं नाहीत. कारण त्यांना वाटत असतं की, असं केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम त्यांच्या पार्टनरवर होऊ शकतो. 

जेव्हा जोडीदार नात्यावरच अवलंबून असेल 

जेव्हा लोक रिलेशनशिप संपवण्याचा विचार करतात. तेव्हा त्यांना असं वाटतं की, कदाचित त्यांचा जोडीदार हे नातं जपण्याचा विचार करत आहे. याचमुळे ते आपल्या पार्टनरचा विचार करतात आणि ब्रेकअप करत नाहीत. संशोधक ऑथर सामंथा जोएल यांनी सांगितलं की, 'रिलेशनशिपवर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवतात आणि त्या ब्रेकअपचा विचारही करत नाहीत.'

तज्ज्ञांचं म्हणणं... 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप करणं फार कठिण असतं. एवढचं नाहीतर जर रिलेशनमधील एक पार्टनर आपल्या नात्यामध्ये खूश असेल आणि दुसरा त्या नात्याला कंटाळला असेल तर अशावेळी ब्रेकअप करणं अत्यंत कठिण होतं. 

इतर संशोधनांनुसार...

इतर संशोधनांचा विचार केला तर इमोशन्स आणि रिलेशनशिपमध्ये एकमेकांना दिलेला वेळ या गोष्टीचा निर्णय घेण्यास मदत करतो की, तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे की नाही? अनेकदा लोक असं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांच्याकडे इतर कोणताही पर्याय नसतो. तसेच ज्या व्यक्तींना एकटं पडण्याची भिती वाटते त्या व्यक्तीही काहीही झालं तरिही नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

Web Title: Study on most people stay in an unhappy and unsatisfying relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.