'या' सवयी तुमच्यापासून हिरावून घेतात तुमचा आनंद, दूर करा 'या' सवयी रहा आनंदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 15:44 IST2019-08-30T15:34:54+5:302019-08-30T15:44:52+5:30
जर तुम्हाला जीवनात आनंदी रहायचं असेल तर स्वत:पासून अशा काही सवयी दूर ठेवल्या तर तुमचा फायदा होईल.

'या' सवयी तुमच्यापासून हिरावून घेतात तुमचा आनंद, दूर करा 'या' सवयी रहा आनंदी!
जीवनात प्रत्येक व्यक्ती आनंदाचा शोध घेत असते. लोक आनंदी राहण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात. पण हे कधीच विसरू नये की, तुमच्याच काही चुकीच्या सवयी तुमचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेत असतात. जर तुम्हाला जीवनात आनंदी रहायचं असेल तर स्वत:पासून अशा काही सवयी दूर ठेवल्या तर तुमचा फायदा होईल. या सवयीच तुमच्या जीवनात काही अडचणी घेऊन येतात आणि आनंद तुमच्यापासून दूर जातो.
१) आनंदाची वाट पाहणे
तुमच्या जीवनातून आनंद निघून जाण्याचं कारण म्हणजे आनंदाची वाट बघणं हे आहे. तुम्ही कधीही आणि कुठेही आनंद राहू शकता. आनंदी राहण्यासाठी वेळ आणि जागेबाबत विचार करण्याची गरज नाही. जर तुम्हाला वाटेल की, आनंद स्वत:हून तुमच्या जीवनात येईल तर तुम्ही अनेक खास क्षणांना मुकाल.
२) दुसऱ्यांना प्राथमिकता देणे
दुसऱ्यांची मदत करणं चांगली गोष्ट असते. पण जर तुम्ही नेहमीच असं करत असाल तर तुम्ही आनंदी राहू शकणार नाहीत. कारण दुसऱ्यांसोबत स्वत:ला प्राथमिकता देणेही गरजेचं असतं. तुम्ही जर त्या लोकांपैकी असाल जे आनंदासाठी स्वत:पेक्षा जास्त दुसऱ्यांकडे अधिक लक्ष देत असता तेव्हा तुम्ही आनंद तुमच्यापासून दूर करत असता.
३) मानसिक शांतता नसणे
जर तुम्ही नेहमी तणावाने ग्रस्त राहत असाल, तर तुम्ही फार आनंदी राहू शकणार नाही. आनंदी राहण्यासाठी मानसिक शांतता असणं फार गरजेचं असतं. स्वत:ला शांत करण्यासाठी थोडा वेळ शांततेत घालवा आणि जीवनात पुन्हा नव्याने आनंद घेऊन या.
४) आनंदासाठी दुसऱ्यांवर निर्भर असणे
जर तुम्हाला कुणी आनंदी ठेवू शकत असेल तर ती व्यक्ती केवळ तुम्हीच आहात. त्यामुळे आनंदासाठी दुसऱ्यावर निर्भर राहणं वाईट गोष्ट आहे. याने तुमचा आनंद कमी होतो. तुमच्या आनंदासाठी तुम्ही जबाबदार आहात, त्यामुळे स्वत:ला दुसऱ्या कोणाला कंट्रोल करू देऊ नका.
५) नवीन गोष्टी न करणे
नव्या गोष्टी करण्याचा संबंध आनंदाशी आहे. जेव्हा तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा याने तुमच्या जीवनात आनंद येतो. त्यामुळे त्याच त्याच जुन्या गोष्टींवर अडकून राहू नका. सतत काहीतरी नवीन शिकण्याचा, करण्याचा प्रयत्न करत रहा.