पार्टनर ऑनलाइन अफेअरमध्ये तर बिझी नाही ना? कसं ओळखाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:22 IST2019-04-10T15:15:48+5:302019-04-10T15:22:39+5:30
जर तुमच्या तुमच्या पार्टनर मग ती महिला असो वा पुरुष काही बदल झाले असतील तर त्याकडे लक्ष देऊन बघा.

पार्टनर ऑनलाइन अफेअरमध्ये तर बिझी नाही ना? कसं ओळखाल...
(Image Credit : MomJunction)
जर तुमच्या तुमच्या पार्टनर मग ती महिला असो वा पुरुष काही बदल झाले असतील तर त्याकडे लक्ष देऊन बघा. अनेकदा असं काही असेल तर व्यक्तीच्या वागण्यात वेगवेगळे बदल बघायला मिळतात. म्हणजे ते फोन किंवा ऑनलाइन असताना अधिक खूश राहू लागतात. चला जाणून घेऊ ऑनलाइन अफेअर कसं ओळखाल..
स्लीप पॅटर्नमध्ये बदल
जे लोक ऑनलाइन अॅक्टिविटीमध्ये गुंतलेले असतात ते रात्री उशीरापर्यंत जागतात. जर त्यांचं काही सुरू असेल तर असे लोक हे रात्रभर ऑनलाइन टाइमपास करत असतात. ऑनलाइन कुणाशी चॅटींग करत असताना त्या व्यक्तीचं कशात काही लक्ष राहत नाही.
प्रायव्हसीची मागणी
जर तुमच्या पार्टनरचं ऑनलाइन अफेअर सुरू असेल तर ती व्यक्ती त्यांचा फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप सर्वांपासून दूर ठेवतात. त्याला कुणालाही हात लावू देत नाहीत. ते कधीही फोनवर एखाद्या कोपऱ्यात बघायला मिळतात. इतकेच काय तर ते फोनचा पासवर्डही बदलतात. अशात जर तुम्ही त्यांचा फोन चेक केला तर त्यांना राग येतो.
घरातील कामांकडे दुर्लक्ष
तुमची फसवणूक करणारा तुमचा पार्टनर जास्तीत जास्त वेळ ऑनलाइन राहतो तेव्हा तेव्हा ते घरातील कामांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या सोडून ते भलतीकडेच लक्ष देत आहेत.
लपवण्याचा प्रयत्न
जे पार्टनर फसवणूक करतात ते सतत काहीतरी लपवत असतात. ते त्यांचे क्रेडिट कार्ड बिल्स, डेटिंग साइट्स किंवा अॅडल्ट साइट्स लपवण्याचा प्रयत्न करतात. ते गोष्टी लपवण्यासाठी खोटं बोलतात.
व्यवहारात बदल
जर त्यांचं कुठे काही सुरू असेल तर त्यांच्या वागण्यात फार बदल बघायला मिळतो. जर तो शांत असेल तर आनंदी राहील किंवा अचानक फार उत्तेजित होईल.