Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:23 IST2017-07-08T12:56:44+5:302017-07-13T14:23:06+5:30
त्यानेही आपल्यावर मनापासून प्रेम करावे असे आपणास वाटत असेल तर त्याच्या मनात स्वत:चे विशेष स्थान निर्माण करावे लागेल.
.jpg)
Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?
स नेसृष्टीत बहुतांश चित्रपट हे प्रेमावर आधारित बनविण्यात आले आहेत. त्यात प्रेमाची प्रत्येक परिभाषा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपणही कुणावर प्रेम करीत असाल आणि त्यानेही आपल्यावर मनापासून प्रेम करावे असे आपणास वाटत असेल तर त्याच्या मनात स्वत:चे विशेष स्थान निर्माण करावे लागेल. प्रेम ही जबरदस्तीने होणारी गोष्ट नाही. परंतु प्रेमाच्या भावनेला खतपाणी घालण्याचे काम मात्र तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी खालील गोष्टी उपयोगी ठरतील.
* सर्वोत्तम बना
त्याच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी वेगळे बना. त्याला याची जाणीव होऊ द्या की त्याच्या अवतीभोवतीच्या मुलींपेक्षा तुम्ही वेगळ्या आहात. तुम्ही सर्वोत्तम आहात असे त्याला वाटण्याचे कारण तुमच्यात असायला हवे.
* चेहऱ्यावर हास्य ठेवा
आपल्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून कुणालाही चांगले वाटते. शिवाय आनंदी आणि विनोदी मुली प्रत्येकालाच आवडतात. स्वत:ला एकलकोंडे किंवा शांत स्वभावाची असल्याचे दाखवू नका. त्याच्या विनोदांवर हसा आणि तुमची विनोदी बाजू त्याला दिसू द्या. हसण्याची सवय लावा.
* लूक आकर्षक बनवा
लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात आपल्या दिसण्याची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आपल्या दिसण्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही स्कीनटाईट कपडे घालायला लागा. तुम्ही जशा आहात तशाच राहा. पण त्यातच उत्तम दिसण्याचा प्रयत्न करा.
* त्याला समजून घ्या
आपले म्हणणे कुणीतरी ऐकुण घेतोय हे कुणालाही चांगले वाटते. त्यासाठी तुम्हीच एकटे बोलू नका. त्यालाही बोलू द्या. मुलांनाही स्वत:विषयी बोलायला आवडते. त्यामुळे कोणी आपलं ऐकतय हे पाहून त्यांना आनंद होतो. एखाद्या मुलाला आकर्षित करायचं असेल तर त्याचं ऐकण्यात अधिक वेळ घालवा.
* आधार बना
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती हवी असते जिच्यावर तो किंवा ती विसंबून राहू शकेल. तो तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो हे तुमच्या वागण्यातून त्याला दाखवून द्या. यामुळे तो तुमच्याकडे आकर्षित होईल.
* द्यायला शिका
नात्यात देण्याची भावना राखायला तुम्हाला आवडते हे त्याला कळू द्या. जेव्हा मुलाला लक्षात येते की तुम्ही त्याच्यासोबत कुठल्याही स्वार्थी कारणांसाठी नाहीत तेव्हा त्याला तुमची किंमत कळेल. तुम्ही खरेच त्याची काळजी करता हे त्याला कळू द्या. यामुळे तो नक्कीच तुमच्या प्रेमात पडेल.
Also Read : Relation : 'या' कारणाने अति प्रेमही ठरु शकते नात्यासाठी घातक !