Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:40 IST2017-08-31T10:10:19+5:302017-08-31T15:40:19+5:30

त्यांच्या या सवयी ओळखल्या गेल्या तर वेळेआधीच सतर्क होऊन मिळणाऱ्या धोक्यापासून वाचता येऊ शकते.

Relationship: Warning Signs Of Partners' Warning! | Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !

Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !

लिवूडच्या जवळपास सर्वच चित्रपटांची थीम प्रेमावर आधारित असते. विशेषत: प्रेमात धोका मिळणे, म्हणजेच नायक-नायिकेचे ब्रेकअप होणे ही थीमदेखील लोकांना खूप आवडते. या गोष्टी चित्रपटात ठिक आहेत, मात्र प्रत्येक्ष आयुष्यात आपल्या पार्टनरने दिलेला धोका सहन करण्यापलिकडचा असतो.   
रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जर आपल्याला एखाद्याने धोका दिला असेल तर पुढच्या वेळी कोणासोबत रिलेशन बनविण्याअगोदर नक्कीच सखोल विचार कराल. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार शेवटी कुणावर विश्वास ठेवावा हाच मोठा प्रश्न आहे. 

याच प्रश्नावर आधारित बऱ्याच मानसोपचार तज्ज्ञांनी अभ्यास केला असून त्यात प्रेमात धोका देणाऱ्या व्यक्तींमध्ये काही गोष्टी कॉमन असतात, असे जाहिर केले आहे. जर त्यांच्या या सवयी ओळखल्या गेल्या तर वेळेआधीच सतर्क होऊन मिळणाऱ्या धोक्यापासून वाचता येऊ शकते. आज आपण याच विषयावर चर्चा करुया ज्या जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.   

सर्वप्रथम आपण ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या सवयींवर काळजीपूर्वक लक्ष द्या. अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञांच्या संशोधनानुसार, जी मुले आपल्या पार्टनरपेक्षा जास्त पैसे कमवितात त्यांच्यात धोका देण्याची शक्यता अधिक असते. 

अभ्यासात असेही म्हटले आहे की, जी मुले आपल्या पार्टनरपेक्षा खूप कमी कमवितात त्यांचेही धोका देण्याचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त आपल्या पार्टनरच्या मित्रांच्या बाबतीतही तपास करून त्याची विश्वसनियता पडताळू शकता. जर आपल्या पार्टनरच्या मित्रांचाही स्वभाव धोका देण्यासारखा असेल तर तुमचा पार्टनरही तुम्हाला कधीनाकधी धोका देऊ शकतो. यासाठी ज्यांचे मित्रमंडळी अशा स्वभावाचे असतील तर अशा मुलांशी रिलेशनशिप न ठेवलेलीच बरी.  

Also Read : OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !    
                   : ​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !

Web Title: Relationship: Warning Signs Of Partners' Warning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.