Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 15:27 IST2017-07-13T09:24:16+5:302017-07-13T15:27:30+5:30

अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपला पार्टनर नाराज होऊ शकतो. जाणून घ्या कोणती आहेत ती कारणे !

Relationship: 'These' can be a partner because of the upset! | Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !

Relationship : ​‘या’ कारणांनी पार्टनर होऊ शकतो नाराज !

्याचदा आपण काही गोष्टी कमविण्याच्या प्रयत्नात आनंदाचे आणि महत्त्वाचे क्षण गमवून बसतो. विशेषत: अति पैसा कमविण्याचा हव्यास, त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, जबाबदाऱ्या यांच्या नादात आपले आपल्या जवळच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष होते. शिवाय पार्टनरला पुरेसा वेळ देऊ न शकल्यामुळे आयुष्यातील रोमान्स कमी होतो आणि पार्टनर नाराज होतो. याव्यतिरिक्तही अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपला पार्टनर नाराज होतो. 

* लवकर यश मिळवण्याच्या नादात अनेकजण ८ तासांऐवजी अधिक वेळ काम करतात. यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नाही. 

* शिक्षण व करिअरमध्ये असलेली अती महत्वाकांक्षा पुरुषांना बेचैन करते. सगळ्यांच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत ते अनेक गोष्टी गमावतात. 

* पुरुषांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी दिवसेंदिवस बिघडत असल्यामुळे त्यांची शारिरीक शक्ती कमी होते. 

* सतत पॉर्न फिल्म पाहणाऱ्या व्यक्तीचे मन नेहमी वासनेने भरलेले असते. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यातील संबंधांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्याला आपल्या जोडीदाराच्या सहवासाने फारसे समाधान मिळत नाही. 

* व्यसनांमुळे हजारो लोकांचे कौंटुंबिक जीवन उद्धवस्त झाले आहे. या सवयींमुळे स्पर्म काऊंट कमी होतो. 

* तणावामुळे व्यक्ती दुर्बळ बनते. मन तणावाने भरलेले असेल तर व्यक्ती कोणतीच गोष्ट मनापासून व आनंदाने करू शकत नाही. 

* सध्या उपलब्ध असलेल्या टीव्ही, मोबाईल अशा उपकरणांमुळे घरातील संवाद कमी होत आहे. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी जी जवळीक निर्माण व्हायला हवी ती अनेक जोडप्यांमध्ये होत नाही. 

Also Read : ​Relationship : मुलींनो, त्याचा लग्नास नकार कसे ओळखाल?
                   : ​Relationship : त्याचे मन जिंकण्यासाठी काय कराल?

Web Title: Relationship: 'These' can be a partner because of the upset!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.