Relationship : ​शाहरुख आणि गौरीच्या मजबूत नात्याचे हे आहे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 12:56 IST2017-08-10T06:59:31+5:302017-08-10T12:56:24+5:30

विशेष म्हणजे शाहरुख आणि गौरी अशा इंडस्ट्रिशी निगडित आहेत ज्या ठिकाणी ब्रेकअप्स आणि डायव्हर्स खूपच कॉमन गोष्टी आहेत. जाणून घ्या दोघांच्या नात्याचे सिक्रेट !

Relationship: This is the secret of Shah Rukh and Gauri's strong relationship! | Relationship : ​शाहरुख आणि गौरीच्या मजबूत नात्याचे हे आहे रहस्य !

Relationship : ​शाहरुख आणि गौरीच्या मजबूत नात्याचे हे आहे रहस्य !

लिवूड किंग शाहरुख खान आणि गौरी यांच्या लग्नाला या वर्षी आॅक्टोंबर महिन्यात २६ वर्ष पूर्ण होत आहेत. हे दोघेही तीन दशकांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. विशेष म्हणजे शाहरुख आणि गौरी अशा इंडस्ट्रिशी निगडित आहेत ज्या ठिकाणी ब्रेकअप्स आणि डायव्हर्स खूपच कॉमन गोष्टी आहेत.  

Image result for shahrukh and gauri khan

शाहरुखने एका टीव्ही शो दरम्यान सांगितले होते की, आम्ही पण दुसऱ्या पती-पत्नीसारखे एकमेकांशी भांडण करतो. मात्र गौरीच्या सपोर्टशिवाय काहीच शक्य नाही. विशेषत: जसा काळ लोटला जात आहे, तसे आमच्यातील प्रेम वाढतच आहे, असेही शाहरुख म्हणाला होता. दोघांचे लग्न आॅक्टोंबरमध्ये झाले होते आणि शाहरुख ‘दिल आशना है’ या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. अशावेळी त्यांचा मधुचंद्र मूव्ही सेटच होता, आणि हे सर्व शक्य झाले ते गौरीच्या सपोर्टमुळेच असे तो आवर्जून सांगतो.

 Related image

शेड्यूल कितीही व्यस्त असेल, हे कपल एकमेकांसाठी तसेच परिवार आणि मुलांसाठी परिपूर्ण वेळ काढतातच. त्यांची ही बॉन्डिंग त्यांच्या हॉलिडे फोटोजवरुन दिसतेच.

 Image result for shahrukh and gauri khan

एकदा किंग खानने एका टीव्ही शो मध्ये सांगितले होते की, ‘मला रात्रीच्या एकांतात बसण्याची गरज नाही कारण, आमचे खूपच प्रिय मुले आमच्या दोघांच्या प्रेमाचे प्रतिक आहेत. या कपलने एक आगळे वेगळे साम्राज्य निर्माण केले आहे. हे दोघे लाइफ पार्टनरच नव्हे तर प्रोफेशनल पार्टनरदेखील आहेत. दोघांना देशातील सर्वात श्रीमंत कपल म्हणून ओळखले जाते. याचे रहस्य म्हणजे हे केवळ रोमॅँटिकच नव्हे तर प्रोफेशनल कपलदेखील आहेत.  

Image result for shahrukh and gauri khan

या कपलचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे कामाच्या व्यापाचा परिणाम आपल्या नात्यावर कधीही होऊ देत नाहीत. दोघेही कामाच्या प्रति जेवढे समर्पित आहेत तेवढेच आपले नाते आणि परिवारासाठीदेखील प्रोटेक्टिव्ह आहेत.   

Also Read : ​Relation : ​आपला पार्टनर दूर जाऊ नये म्हणून...!
                   Relation : ​चुकूनही पार्टनरला ‘या’ शब्दांचा प्रयोग करु नका, अन्यथा...!

Web Title: Relationship: This is the secret of Shah Rukh and Gauri's strong relationship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.