Relation : ​या ‘पाच’ कारणांनी आपले सुंदर नाते तुटते तेव्हा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 16:32 IST2017-08-26T11:02:42+5:302017-08-26T16:32:42+5:30

आपले सुंदर नाते तुटण्याआधी आपले कुठे चुकत आहे, हे ओळखा आणि नाते जपा. चला जाणून घेऊया याबाबत...!

Relation: When these 'Five' reasons break your beautiful relationship! | Relation : ​या ‘पाच’ कारणांनी आपले सुंदर नाते तुटते तेव्हा !

Relation : ​या ‘पाच’ कारणांनी आपले सुंदर नाते तुटते तेव्हा !

ong>-रवींद्र मोरे 
असे म्हटले जाते की, नाते बनविण्यापेक्षा नाते टिकविणे खूप महत्त्वाचे असते. बऱ्याचदा आपला पार्टनर आपल्यासाठी परफेक्ट असतो. आपले त्याच्याशी असलेले नातेदेखील खूप सुंदर असते. अगदी सुरळीत चालू असते, मात्र नकळत हळूहळू आपल्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो. नात्यात दुरावा निर्माण होण्याच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे मत्सर होय. बऱ्याचदा या दुराव्यामुळे नाते तुटण्याचीही शक्यता असते. यासाठी आपले नाते तुटण्याआधी आपले कुठे चुकत आहे, हे ओळखा आणि नाते जपा. चला जाणून घेऊया याबाबत...! 

* बऱ्याचदा आपण आपली स्वत:ची तुलना इतरांशी करतो. यामुळे माझ्याकडे इतरांपेक्षा काहीतरी कमी या भावनेतून मत्सर निर्माण होतो आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा. तुमच्या जोडीदाराने इतरांना नाही तर तुम्हाला जोडीदार म्हणून का निवडले याचा विचार करा. जेव्हा तुम्ही इतरांशी तुमची तुलना करणे बंद कराल तेव्हा तुमचे असुरक्षित वाटणे आपोआप कमी होऊ लागेल.  

* बऱ्याचदा आपण आपल्या जोडीदाराला मालकीहक्क असल्याची वागणूक देतो. आपण हे विसरतो की, आपल्याप्रमाणेच त्यालाही स्वातंत्र आहे. त्याचेही एक वैयक्तिक अस्तित्व असते व त्यामुळे त्याला त्याच्या अथवा तिच्या मित्र-मैत्रिणी अथवा इतर व्यक्तींशी मोकळेपणाने बोलण्याची मुभा असायला हवी. त्यामुळे जर तुमचे नाते सुदृढ असेल तर तुम्ही आयुष्यभर एकत्र असाल यावर विश्वास ठेवा. एकमेंकांना समजून घ्या व एकमेकांचा आदर करा.  

* नात्याबाबत जास्त विचार करणेदेखील बाधक ठरते. कारण अशाने सर्व काही सुरळीत असताना तुम्ही मुद्दाम समस्या निर्माण करीत असता. त्यामुळे जर त्याच्या अथवा तिच्या मित्रमैत्रीणीसोबत असताना तो अथवा ती तुमचा फोन उचलत नसेल तर लगेच त्याचे अथवा तिचे अफेअर सुरु असेल अशी कल्पना करु नका. कदाचित त्यांचा फोन हरवला असेल अथवा सायलेंटवर असेल.

* आपणास आपल्या जोडीदाराविषयी काही शंका वाटत असेल तर त्याच दिवशी बोलून विषय क्लियर करा. त्याचे रुपांतर मत्सरामध्ये होऊ देऊ नका. चुकीचा संशय घेऊन नको ते पुरावे शोधण्यात वेळ घालवू नका. कारण अशाने तुमच्या हातात काहीच येणार नाही. याविषयी तुमच्या मित्रमैत्रीणींसोबत काहीही सांगू नका कारण तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला कोणीच ओळखू शकत नाही. अंधपणे मत्सर करण्यापेक्षा तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवा.

* आपणास त्याच्या अथवा तिच्या मित्रमैत्रिणीबाबत मत्सर वाटत असेल तर त्यांना जवळून ओळखण्यासाठी त्यांच्यासोबत थोडावेळ घालवा. तुमच्या पतीला अथवा पत्नीला तुम्ही त्यांच्या बेस्ट फ्रेन्डसोबत वेळ घालवलेला नक्कीच आवडेल. त्यामुळे तुमच्या जोडीदाराचे नकळत पुन्हा तुमच्याकडेच अधिक लक्ष जाईल. तुलना करुन अथवा रागाने ही समस्या सोडविण्यापेक्षा शहाणपणाने यातून मार्ग काढा.

Also Read : ​OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !   
                   : ​Relation : ​आपला पार्टनर दूर जाऊ नये म्हणून...!

Web Title: Relation: When these 'Five' reasons break your beautiful relationship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.