Relation : दीपिकाच नव्हे, ‘या’ ५ कारणांनी प्रत्येक मुलगी करु शकते ब्रेकअप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 17:56 IST2017-09-01T12:26:15+5:302017-09-01T17:56:15+5:30
कोणत्या कारणाने मुली Breakup करतात, जाणून घ्या ती कारणे..!
.jpg)
Relation : दीपिकाच नव्हे, ‘या’ ५ कारणांनी प्रत्येक मुलगी करु शकते ब्रेकअप !
असे म्हणतात की, प्रेमात मनुष्य सर्वकाही विसरुन जातो. मात्र प्रेमात फक्त कमिटमेंटच दिसत असेल तर हे प्रेमाचे नाते कधीपर्यंत टिकेल याची शाश्वती नसते. असे नाते पुढे नेण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा करिअर समोर येते. कमिटमेंट करायला फक्त मुलेच नाही तर मुलीदेखील घाबरतात.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचेच उदाहरण पाहा ना. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची खूपच चर्चा झाली होती. दीपिका आपल्या करिअरवर खूपच फोकस करते म्हणून ती रणवीरला कमिटमेंट द्यायला घाबरते. केवळ दीपिकाच नव्हे तर बहुतेक मुली असा विचार करतात. चला जाणून घेऊया की, केवळ कमिटमेंटच्या आधारे बे्रकअप का होतो.
* करिअरला अधिक महत्त्व
सध्याच्या मॉडर्न काळात मुलांप्रमाणेच मुलीदेखील आपले करिअर घडविण्यात व्यस्त आहेत. आपल्या रिलेशनपेक्षा करिअरला जास्त महत्त्व देतात. याच कारणाने त्या लवकर कोणतेच कमिटमेंट करीत नाहीत.
* स्वावलंबत्व
आज प्रत्येकाला स्वतंत्र जगायला आवडते. आपल्या पर्सनल लाइफमध्ये दुसऱ्याची दखल कुणालाही आवडत नाही. यासाठी सध्याच्या मुली दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतात.
* जबाबदारीपासून बचाव
लग्नानंतर मुलांच्या आयुष्यात विशेष बदल होत नाही, मात्र मुलींवर संपूर्ण परिवाराची जबाबदारी येते. काही मुली या जबाबदारीपासून वाचण्यासाठीदेखील लग्नासारख्या कमिटमेंटमध्ये पडणे पसंत नाही करत.
* वाढते वय
अगोदर अगदी कमी वयात लग्न होत होते, मात्र आज लोकांचे विचार बदलले आहेत. लग्न कधीही करु शकतो असा विचार आता अमलात आणला जात आहे. असाच विचार आता मुलीदेखील करु लागल्या आहेत. अगोदर करिअर पाहू आणि त्यानंतर लग्नाचा विचार करु असे ठामपणे सांगणाऱ्या मुलीदेखील आहेत.
*ओळख निर्माण करणे
प्रत्येकजण आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशिल असतो. यामुळे बहुतेक मुली लग्नाच्या कमिटमेंटला घाबरतात.
Also Read : OMG : ब्रेकअप झाल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या मुलीला पटविण्याचा प्रयत्न करतात मुले !
: Relation : या ‘पाच’ कारणांनी आपले सुंदर नाते तुटते तेव्हा !