Relation : आपल्या पार्टनरचे विवाहबाह्य संबंध तर नाहीत ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 14:25 IST2017-06-30T09:23:59+5:302017-07-13T14:25:51+5:30
या धावपळीच्या युगात पती-पत्नींचा संबंध फारसा कमी येतो. त्यामुळे आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध तिच्या लक्षात येई पर्यंत बराच उशिर झालेला असतो.
.jpg)
Relation : आपल्या पार्टनरचे विवाहबाह्य संबंध तर नाहीत ना?
अ ोदर लग्न हे पवित्र बंधन समजले जायायचे, आता मात्र लग्नाला निव्वड सामाजिक जबाबदारी समजली जाते. त्यातच बदलती जीवनशैली, पाश्चात्त्यांचे अनुकरण आदी कारणांमुळे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या धावपळीच्या युगात पती-पत्नींचा संबंध फारसा कमी येतो. त्यामुळे आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध तिच्या लक्षात येई पर्यंत बराच उशिर झालेला असतो. असे होऊ नये म्हणून महिलांनी वेळीच काळजी घ्यायला हवी. यासाठी खाली काही खास टिप्स देण्यात आलेल्या आहेत ज्या आपणास नक्की कामी येतील.
* फोन कॉल्स
जर तो कुणाशी एकट्यात बोलत असेल किंवा रात्री उशीरापर्यंत बोलत असेल आणि तुमचे लक्ष जाताच फोन कट करत असेल तर काहीतरी गडबड आहे असे समजा. तुमच्या पतीची बाहेर दुसरी भानगड असू शकते.
* वागणुकीत बदल झाल्यास
आपल्या पतीच्या वागणुकीत बदल आढळुन आल्यास समजावे की, त्याचे बाहेर काहीतरी सुरू आहे. आपल्याबद्दल प्रेमभाव कमी होणे, आपल्यावर पटकन रागावणे, किरकोळ गोष्टींवरून वाद घालणे अशा गोष्टी पुरुष करायला लागतात. जर असे बदल आपल्या पतीमध्ये दिसून आल्यातर तुमच्या पतीच्या आयुष्यात दुसरी स्त्री असू शकते.
* कुटुंबासाठी वेळ न देणे
तो जर तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देत नसेल, मुले व तुमच्यासोबत कमी बोलत असेल तर तुम्ही सावधान व्हायला हवे.
* गोष्टी लपवणे
जर तो तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवत असेल व त्या गोष्टी तुम्हाला इतरांपासून कळत असतील तर ही चिंतेची बाब आहे. असे घडत असल्यास आपल्या पतीचे बाहेर काही प्रकरण तर नाही, याचा तपास लावा.
Also Read : INTERESTING : गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा !