Relation : ​लग्नानंतर महिलांना वाटते या ‘५’ गोष्टींची भीती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 15:03 IST2017-09-06T09:33:11+5:302017-09-06T15:03:11+5:30

लग्नानंतर प्रत्येक महिलेला वाटणारी ही भीती ती आपल्या पतीलाही सांगू शकत नाही, जाणून घ्या !

Relation: Fear of '5' things that women feel after marriage! | Relation : ​लग्नानंतर महिलांना वाटते या ‘५’ गोष्टींची भीती !

Relation : ​लग्नानंतर महिलांना वाटते या ‘५’ गोष्टींची भीती !

्नानंतर मुली स्वत:ला प्रत्येक गोष्टीत सुरक्षित समजतात. तसे पती-पत्नीचे नाते विश्वास आणि प्रेमावर टिकलेले असते मात्र थोडासा संशयदेखील नात्यात दूरावा निर्माण करु शकतो. नेमके याच कारणांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. बहुतेक महिला याच गोष्टींवरुन नेहमी चिंतेत आपले आयुष्य व्यतित करीत असतात. आज आपण जाणून घेऊया अजून अशा कोणत्या गोष्टींमुळे भीती वाटते.  

* विश्वास  
विश्वासावर सर्वच नाते टिकलेले आहेत. मात्र लग्नानंतर आपण सासरच्या मंडळींचा विश्वास संपादन करु शकू की नाही अशी भीती महिलांना नेहमी वाटत असते. 

* नावड 
आपला पती लग्नाच्या ४ ते ५ वर्षानंतर आपल्याला नापसंत तर करणार नाही ना? ही भीती बहुतेक महिलांना नेहमी सतावत असते. या भीतीपोटी ती स्वत:ला सुंदर आणि फिट ठेवण्याचा खूप प्रयत्न करीत असते.  

* एकटेपणा  
लग्नांनतर तिला पतीच्या रुपाने आयुष्यभर सोबत राहणारा जोडीदार जरी मिळाला असला तरी सासरच्या मंडळींपासून वेगळे झाल्यानंतर आपल्या पतीनेही साथ सोडली तर आपण एकटे होऊ ही भीती तिला नेहमी सतावत असते.    

* परिवाराचे आरोग्य 
लग्नानंतर महिलांना नेहमी परिवाराच्या आरोग्याची चिंता सतावत असते. यासोबतच तिला स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. एखादी आरोग्याची समस्या तिला निर्माण होऊ नये म्हणून ती प्रयत्न करीत असते. याच चिंतेत तिचे संपूर्ण आयुष्य व्यतित होत असते.  

* नात्यात दूरावा 
तिला सासरच्या मंडळींचे नाते तर जोपासावे लागतेच शिवाय माहेरच्या व्यक्तींचीही चिंता सतावत असते. प्रत्येक नाते जोपासण्यासाठी तिला तारेवरची कसरत करावी लागते. एखाद्या चुकीमुळे कोणत्याही नात्यात दूरावा निर्माण होऊ नये म्हणून ती आयुष्यभर प्रयत्न करीत असते.  
  
Also Read : Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !
                   : Relationship : पार्टनरची 'ही' लक्षणे देतात धोक्याची सुचना !



   

Web Title: Relation: Fear of '5' things that women feel after marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.