Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 12:56 IST2017-09-03T07:26:55+5:302017-09-03T12:56:55+5:30

जर आपली पार्टनर आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटत असेल तर आजच आपल्या त्या वाईट सवयी सुधारायला हव्यात. जाणून घ्या त्या वाईट सवयींबाबत...

Relation: Due to these '5' children, the girls flee away! | Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !

Relation : ​मुलांमधील या ‘५’ सवयींमुळे मुली पळतात दूर !

ong>-रवींद्र मोरे 
मुलींशी रिलेशन तयार करण्यासाठी मुले खूपच प्रयत्न करतात आणि बऱ्याचदा ते यशस्वीदेखील होतात. रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात सर्वकाही व्यवस्थित चालते मात्र वेळेनुसार दोघांना एकमेकांच्या सवयी समजू लागतात. रिलेशन पुढे गेल्यानंतर मुलींना मुलांच्या काही वाईट सवयी अजिबात आवडत नाहीत, ज्यामुळे काही दिवसांपर्यंतच रिलेशन टिकते. जर आपली पार्टनर आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटत असेल तर आजच आपल्या त्या वाईट सवयी सुधारायला हव्यात. जाणून घ्या त्या वाईट सवयींबाबत... 

* मुलींचा आदर न करणे 
मुलींचा आदर न करणारे मुले मुलींना अजिबात आवडत नाहीत. जर आपणही मुलींचा आदर करीत नसाल तर आपल्याशी कोणतीच मुलगी मैत्री करणार नाही. म्हणून ही सवय आताच बदला.  

* फ्लर्ट करण्याची सवय 
बऱ्याच मुलांना मुलींसोबत फ्लर्ट करण्याची सवय असते. काही मुले तर आपल्या गर्लफ्रेंडसमोरच दुसऱ्या मुलीसोबत फ्लर्ट करणे सुरु करतात. मुलींना असे मुले अजिबात आवडत नाहीत.  

* दुसऱ्या मुलींना एकटक पाहणे 
काही मुले आपल्या पार्टनरसमोरच दुसऱ्या मुलीला एकटक पाहतात. ही सवय आपले नाते संपुष्टात आणण्यासाठी पुरेसी आहे. याने आपले नाते सहज तुटू शकते.  

* दुर्लक्ष करणे 
जर आपली पार्टनर आपणास कॉल किंवा मॅसेज करीत आहे आणि आपण त्याचा रिप्लाय देत नसाल अशाने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. मुलींना असे दुर्लक्ष केलेले अजिबात आवडत नाही.   
 
* व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करणे

बऱ्याच मुलांना आपल्या पार्टनरच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करण्याची सवय असते. हे मुलींना अजिबात आवडत नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. असे आता मुलींनाही वाटू लागले आहे. 

Also Read : OMG : ​मुलांना अजिबात आवडत नाहीत ‘या’ प्रकारच्या मुली !
                   OMG : प्रेम न करता थेट लग्न करणारे ‘या’ फायद्यांपासून राहू शकतात वंचित !

Web Title: Relation: Due to these '5' children, the girls flee away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.