(Image Credit : sheknows.com)
प्रत्येक पालकांची अशी इच्छा असते की, आपल्या मुलाने आपल्याला मित्रच समजावं. तुमचीही अशीच इच्छा असेल तर एक काम नक्की करा. ते म्हणजे, त्यांना शिकवताना तुम्हीही त्यांच्यासोबत शिका. यामुळे मुलांच्या नजरेमध्ये तुम्ही एक उत्तम पालक ठरू शकता. तसेच असं केल्याने तुम्ही मुलांना ओरडण्याऐवजी त्यांना समजावणं पसंत करता. याव्यतिरिक्त मुलंही हायपरअॅक्टिव्ह होण्यापासून वाचतो आणि मुलांना लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत मिळते.
मुलं आणि आई-वडिलांमधील संबंध मजबूत एका रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे. जर्नल ऑफ डेव्हलपमेंटल अॅन्ड बिहेविअरल पीडियाट्रिक्सच्या संशोधनामध्ये मुलं आणि आई-वडिलांमधील संबंध मजबूत करण्याबाबत काही उपाय सुचवण्यात आले आहेत. आई-वडिलांनी आपल्या मुलांसोबत एकत्र बसून त्यांचा अभ्यास घेतल्याने मुलांना शैक्षणिक गोष्टींमध्ये अनेक फायदे होतात. पण त्याचबरोबर भावनिकबाबतीतही अनेक फायदे होतात.
पॉझिटिव्ह पॅरेंटिंग स्किल्स होतात विकसित
संशोधनाचे प्रमुख संशोधक आणि रटगर्स विश्वविद्यालयामधील सहाय्यक प्रोफेसर मॅन्युअल जिमेनेज यांनी सांगितले की, संशोधनाचे निष्कर्ष पॉझिटिव्ह स्किल्स डेव्हलप करण्यासाठी पालकांना फार मदत करतात. या निष्कर्षांमधून असं सिद्ध झालं आहे की, 1 ते 3 वर्षांपर्यंत मुलं अभ्यास करत नाहीत. तोपर्यंत पालक त्यांच्याबाबत फार कठोर असतात. तेच 3 ते 5 वर्षांपासून जेव्हा पालक मुलांसोबत अभ्यास करण्यास सुरुवात करतात. त्यावेळी ते मुलांबाबत कमी कठोर असतात.
20 शहरांमधील 2 हजार आई आणि मुलांच्या जोड्यांवर करण्यात आलं संशोधन
संशोधनासाठी संशोधकांनी अमेरिकेच्या 20 मोठ्या शहांतील जवळपास 2000 पेक्षा जास्त मायलेकांच्या जोड्यांची समिक्षा केली, ज्यामध्ये महिलांना विचाण्यात आलं होतं की, ती आपल्या मुलांचा 1 आणि 3 वर्षांच्या वयामध्ये किती वेळा अभ्यास घेतला. त्यानंतर त्याच सर्व महिलांचा 2 वर्षांनंतर पुन्हा इंटरव्यू घेतला. यावेळी शारीरिक आणि मनोवैज्ञानिक पातळीबाबत माहिती घेण्यात आली.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.