शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Happy Promise Day 2021 : वर्षभर पार्टनरसोबतची भांडणं टाळायचीयेत? तर यापैकी एकतरी प्रॉमिस करायला विसरू नका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 11:29 IST

Happy Promise Day 2021: अनेकदा पार्टनरला कोणतेही महागडे गिफ्ट्स नको असतात. फक्त प्रेमाचे (love) दोन शब्द पुरेसे असतात. अशावेळी तुम्ही पार्टनरला प्रॉमिसकरून आपलं प्रेम व्यक्त करू शकता. 

व्हॅलेनटाईन वीकचा आज पाचवा (Happy promise day 2021) दिवस आहे.  प्रॉमिस (promise) ही लहानशी वाटणारी गोष्ट तुम्हाला मोठ्या भांडणांपासून वाचवू शकते. अनेकदा आपण प्रॉमिस करतो पण ते पूर्ण होईल की नाही याबाबत शंका असते. तर आज तुम्ही पार्टनरला किंवा कोणत्याही प्रिय व्यक्तीला प्रॉमिस करून आजचा दिवस साजरा करू शकता. पण प्रॉमिस कसं असावं याबाबत तुम्हाला काही कल्पना नसेल तर आम्ही तुम्हाला पार्टनरला कोणतं प्रॉमिस (Valentine Promise Day 2021) करायचं याबाबत सांगणार आहोत. त्यामुळे आज तुमची पार्टनर नक्की खूश होईल. अनेकदा पार्टनरला कोणतेही महागडे गिफ्ट्स नको असतात. फक्त प्रेमाचे दोन शब्द पुरेसे असतात. अशावेळी तुम्ही  पार्टनरला प्रॉमिसकरून आपलं प्रेम (Love) व्यक्त करू शकता. 

मी नेहमी तुझी साथ देईन- आयुष्यात कितीही दुःख अथवा संकटं आले तरी मी नेहमी तुला साथ देईन. तुझ्या यशस्वी होण्यासाठी सावलीप्रमाणे तुझ्यासोबत असेन. तुला एकटं वाटू देणार नाही.

तुझ्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही- सारं जग माझ्याविरोधात असेल तरी मी तुझ्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. मी नेहमी तुझं रक्षणं करेन. कोणतीही व्यक्ती तुझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर असं काही होऊ देणार नाही. ज्यामुळे तुला त्रास होईल.

जबाबदारी- मुलांना सांभाळण्याची गोष्ट असेल किंवा जेवण बनवण्याची, जबाबदारी फक्त तुझीच नाही तर आपली आहे. जीवनातील चढ उतारांचा सामना आपण दोघे सोबत करू. घरच्यांची काळजी घेण्यात सुद्धा मी तुझ्यासोबत असेन. या 8 संकेतांवरून समजून जा, की तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देतोय!

प्रायोरिटी- सगळ्यात आधी माझी प्रायोरिटी तु असशील. तुझे स्थान माझ्या आयुष्यात सगळ्यांच्या आधी असेल. माझ्या मनात तुझ्यासाठी नेहमी सन्मान आणि आदर असेल.

मी तुझ्यावर नेहमी प्रेम करेन- पार्टनरला प्रॉमिस करत असताना मी तुझ्यावर नेहमी प्रेम करेन कधीही अंतर देणार नाही. माझ्या मनातील तुझ्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. हे प्रॉमिस करा. पार्टनरला प्रॉमिस करत असताना गुलाबाचं फुलं किंवा भेटवस्तु द्याल तर तुमची पार्टनर खूप खूश होईल. जाडेपणाला कंटाळून सोडून गेला पहिला बॉयफ्रेंड; अन् आता नवा पाहून सगळ्यांचीच उडाली झोप 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपValentine Weekव्हॅलेंटाईन वीकValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे