या 8 संकेतांवरून समजून जा, की तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देतोय!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 10, 2021 09:50 PM2021-02-10T21:50:31+5:302021-02-10T22:05:22+5:30

प्रेमसंबंधातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वास. नाते पुढे पुढे नेण्यासाठी एकमेकांवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, अनेक वेळा एक पार्टनर (partner) काही काळानंतर नात्यांना हवे तेवढे महत्व देत नाही. परिणामी, बऱ्याचदा ब्रेकअपचीही वेळ येते. (Understand these signs that your partner is cheating you)

प्रेमसंबंधातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विश्वास. नाते पुढे पुढे नेण्यासाठी एकमेकांवर विश्वास असणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, अनेक वेळा एक पार्टनर काही काळानंतर नात्यांना हवे तेवढे महत्व देत नाही. परिणामी, बऱ्याचदा ब्रेकअपचीही वेळ येते.

बॉडी लँग्वेज एक्सपर्ट काय म्हणतात - बॉडी लँग्वेज एक्सपर्ट जुडी जेम्स यांनी डेली मेल वेबसाइटशी बोलताना, काही असेच संकेत सांगितले आहेत. या संकेतांवरून समजू शकते, की आता आपल्या पार्टनरला आपल्याबरोबर असलेले नाते पुढे नेण्याची इच्छा नाही आणि तो कधीही तुम्हाला धोका देऊ शकतो. तर जाणून घेऊयात या बॉडी लँग्वेजसंदर्भात (Body language).

फोनचा अधिक वापर - जुडी यांच्या मते, 'रिलेशनशिप संपवण्याची इच्छा असलेले लोक फोनचा अधिक वापर करू लागतात. पार्टनरचा अधिक सामना करावा लागू नये म्हणून ते फोनमध्येच गुंतून असतात. एवढेच नाही, तर ते फोनच्या बाबतीत अधिक सतर्कदेखील असता. याचे एक कारण असेही सांगता येते, की एक तर त्यांचे आणखी कुठे तरी अफेअर सुरू आहे किंवा ते आपल्या मित्राचे चॅट शेअर करू इच्छित नाहीत.'

बोटे वाजवणे अथवा पाय हलवणे - अनेक वेळा नाते पुढे न नेण्याचा दबाव काही विशेष बॉडी लँग्वेजवरूनही दिसून येऊ शकतो. जसे, टेबल अथवा एखादी गोष्ट वाजवणे. पाय हलवणे अथवा पायांचा आवाज करणे आणि वारंवार केसांतून हात फिरवणे. यांवरून, समोरच्या व्यक्तीत सय्यम कमी असल्याचे दिसून येते.

जुडी यांच्या मते, या बॉडी लँग्वेजवरून समजते, की आपल्या पार्टनरची हे नाते लवकरात लवकर संपविण्याची इच्छा आहे.

याशिवाय, वारंवार पापण्यांची उघड-झाप करणे, डोके रगडणे, ओठ चाटणे आणि व्यवस्थित न बसणेही काही संकेत असू शकतात. आपल्या पार्टनरच्या या बॉडी लँग्वेज ओळखा आणि आपले नाते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा आणि नाते व्यवस्थित होत नाही, असे वाटत असेल, तर स्वतःलाही ब्रेकअपसाठी तयार करा.

स्वतःला शांत अनुभवणे - ब्रेकअप करण्याच्या दबावात काही लोक स्वतःला शांत ठेवण्याचाही प्रयत्न करतात. जसे, कुठल्याही गोष्टींशी खेळणे. स्वतःच्या चेहऱ्याला वारंवार स्पर्ष करणे. याशिवाय आपले ओठ अणि नखे कुरतडणेही एक संकेत आहे.

चेहऱ्याची अभिव्यक्ति आणि बॉडी लँग्वेजमध्ये बदल - जुडी म्हणतात, कपल्स सर्वसाधारणपणे एकमेकांना स्पर्ष करतच असतात आणि एकमेकांच्या अत्यंत जवळ राहतात. मात्र, 'ब्रेकअपची स्थिती आल्यास ते एक-मेकांच्या जवळ जाणे टाळतात. एवढेच नाही, तर ते एकमेकांच्या जवळ बसायलाही संकोच करतात.

याशिवाय आपण डोळ्यांच्या माध्यमानेदेखील हे जाणून घेऊ शकता, की आपला पार्टनर आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम करत नाही.' आपले नाते आता संपुष्टात येऊ शकते, हा अभिव्यक्तीतील बदलातील पहिला संकेत आहे, असेही जुडी यांचे म्हणणे आहे.

डोळ्यांची भाषा - जुडी यांच्या मते, डोळ्यांच्या भाषेतून बऱ्याच गोष्टी समजल्या जाऊ शकतात. त्या म्हणाल्या, 'आपल्या पार्टनरची आपल्यासोबत ब्रेकअप करायची इच्छा असेल तर, तो तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणार नाही. बोलताना एक तर तो खाली पाहील अथवा फोनमध्ये काही तर करत बोलेल. मात्र, जेव्हा आपले त्याच्याकडे लक्ष नसेल तेव्हाच तो आपल्यालापाहील. याचा अर्थ त्याने स्वतःला ब्रेकअपसाठी तयार केले आहे.'

कमी शोधणे - जुडी यांचे म्हणणे आहे, ब्रेकपसाठी स्वतःकडे कमी दोषी यावा यासाठी, ब्रेकअपसंदर्भात विचार करणारी व्यक्ती आपल्या पार्टनरची कमी काढू लागते. याशिवाय डोळे फिरवत बोलणे, तसेच छोट्या-छोट्या गोष्टींवरही चीड-चीड करते.