लग्नानंतरही अनेकांना वाटते या गोष्टींबद्दल असुरक्षितता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 01:04 PM2018-05-25T13:04:12+5:302018-05-25T13:04:12+5:30

लग्न झालेले असे गृहीत धरतात की, त्यांना असुरक्षित कधीच वाटणार नाही कारण त्यांनी आयुष्यभरासाठी जोडीदार निवडलाय. पण प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही.

People talk about the insecurities they struggled even after being married | लग्नानंतरही अनेकांना वाटते या गोष्टींबद्दल असुरक्षितता

लग्नानंतरही अनेकांना वाटते या गोष्टींबद्दल असुरक्षितता

googlenewsNext

नातं कोणतही असो प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या गोष्टींची असुरक्षितता वाटत असते. लग्न, प्रेम आणि मैत्री या नात्यात हे जास्त होतं. लग्न झालेले असे गृहीत धरतात की, त्यांना असुरक्षित कधीच वाटणार नाही कारण त्यांनी आयुष्यभरासाठी जोडीदार निवडलाय. पण प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही. लग्न झालेल्या काहींना अनेकदा अनेक गोष्टींबाबात असुरक्षितता वाटत असते. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत एक रिपोर्ट दिला आहे. यात काही लोकांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत. यानुसार चला जाणून घेऊया लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही अनेकांना कशाबाबत वाटते असुरक्षितता....

1) तो नेहमी आईला अधिक महत्व देतो

लग्नाच्या पाच वर्षांनंतरही तो माझ्यापेक्षाही जास्त महत्व त्याच्या आईला देतो. त्याच्या आईसोबतच तो त्याच्या लाईफ विषयीच्या अनेक गोष्टी शेअर करत असतो. काही दिवसांनी मला याची सवय झाली. मी विचार केला की, तो मुलगा असण्याचं कर्तव्य पार पाडतो. पण तरीही मला अनेकदा या गोष्टीमुळे असुरक्षित वाटतं. माझी जागा दुसऱ्या क्रमांकावर आहे हेच मला वाटतं.

2) जेव्हा ती विरोध करते

तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आमचं लग्न झालं. पण आजही माझी पत्नी महत्वांच्या विषयावर चर्चा करायची असेल तर बोलणं टाळते. ती माझ्यासोबत बोलताना मोकळी होऊ बोलत नाही. तिचे विचार, तिच्या फिलींग्सती शेअर करत नाही. 

3) जेव्हा तो सतत सोशल मीडिया अकाऊंटचे आणि फोनचे पासवर्ड बदलतो

आमचं लग्न 1995 मध्ये झालं. पण इंटरनेट आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग होईपर्यंत मला कधीही कशाही प्रकारची असुरक्षितता वाटली नव्हती. पण आता माझे पती सतत त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे आणि फोनचे पासवर्ड बदलत असतो. त्यामुळे तो माझ्यापासून काहीतरी लपवत असल्याचं वाटत राहतं. 

4) सेक्स फॅन्टसीबाबत बोलणं

आमच्या लग्नाला आता तीन वर्ष झाली तरी सुध्दा मला माझ्या पत्नीसोबत लैंगिक इच्छांबाबत बोलण्यात संकोच वाटतो. माझ्या गोष्टींचा तिने चुकीचा विचार केला तर का होईल, अशी भीती मनात असते. असाच अनुभव जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा आला होता. मी लैंगिक इच्छांबाबत बोलल्यावर ती शॉक झाली होती.  

5) सोशल मीडिया अकाऊंटला सिंगल स्टेटस

मी अनेकदा माझ्या पतीला त्याचं सोशल मीडिया अकाऊंटवरील सिंगल स्टेटस बदलून मॅरिड असं करण्यास सांगितलं. पण त्याने कधीही माझं ऐकलं नाही. त्यावर तो मला कारण देतो की, मला माझी कोणतीही पर्सनल माहीत जाहीर करायची नाहीये. कारण ते अकाऊंट तो प्रोफेशनल कामांसाठी वापरतो. या कारणांनी मला अनेक प्रश्न पडतात.  

6) जेव्हा तिच्या फेसबुकच्या यादीत तिचा एक्स बॉयफ्रेन्ड असतो

माझं आणि तिचं अरेंज्ड मॅरेज झालं होतं. माझ्या पत्नीने मला तिच्या भूतकाळाच्या रिलेशनशिपबाबत सांगितले होते. अर्थातच तिचा बॉयफ्रेन्ड तिच्या फेसबुक फ्रेन्ड लिस्टमध्ये असणारचं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतरही मला यावरुन जरा अवघडल्या सारखं वाटतं. मला जे वाटतंय त्याबाबत जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा तिने काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. 
 

Web Title: People talk about the insecurities they struggled even after being married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.